HW News Marathi
राजकारण

भाजपला संविधानाला हातही लावू देणार नाही

नवी दिल्ली| दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियम मध्ये सोमवारी संविधान बचाव अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थितांना संबोधित करताना भाजप सरकारवर सडकून टिका केली. आपण भाजप आणि आरएसएस ला संविधानाशी छेडछाड करुन देणार नाही. तसेच आम्ही भाजपला संविधानाला हातही लावू देणार नाही असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना राहुल म्हणाले, कॉंग्रेस पार्टी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सविधान लिहले आणि ते देशाला दिले. जी संविधान बॉडी आहे त्यामध्ये मग लोकसभा असो, राज्यसभा असो, आईआईटी असो हे सर्व आपल्याला संविधानाने दिले आहे. संविधान आहे तर देश आहे असे राहुल यांनी उपस्थितांना सांगितले.

सभेत मोदी मुर्दाबाद च्या घोषणा देणा-या कार्यकर्त्यांना मध्येच थांबवत राहुल म्हणाले, आपण कॉंग्रेसवाले आहोत आपण कधीही मुर्दाबाद बोलायचे नाही. कारण सध्या सर्वांनाच माहीत झाले आहे मोदींना दलित, महिला, गरीब जनतेविषयी कोणत्याही प्रकारची संवेदना राहीली नसल्याची टिकाही राहुल यांनी मोदींवर केली. यावेळी कार्यक्रमाला कॉंग्रेस नेत्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित राहीले होते.

Related posts

उद्धव ठाकरे मुंबईत दाखल, शिवसैनिकांनी केले जंगी स्वागत

News Desk

#LokSabhaElections2019 : आम्ही लोकांसाठी एकत्र आलो, आम्हाला गोरगरीबांसाठी सत्ता हवी !

News Desk

सातव्या वेतन आयोगाचे ‘न्यू ईयर गिफ्ट’ कर्मचाऱ्यांना खरोखरच मिळेल का ?

News Desk