HW News Marathi
राजकारण

गोळी लागून पुण्यातील भाजप नगरसेवक जखमी

पुणे | बंदूक साफ करताना चुकून गोळी सुटल्याने भाजपचे नगरसेवक गणेश बीडकर जखमी झाले आहेत . या घटनेत बीडकर यांच्या पायाला गोळी लागल्यामुळे ते जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज (२७ डिसेंबर) सकाळी बीडकर स्वतःच्या घरात बंदूक साफ करत होते.

बीडकर स्वतःच्या घरात बंदूक साफ करत होते. त्यावेळी गोळी सुटून थेट त्यांच्या पायाला लागली आहे. बीडकर हे सध्या पुणे महापालिकेत भाजपचे स्वीकृत नगरसेवक आहेत. यापूर्वी त्यांनी महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्षपद तसेच भाजपचे गटनेतेपद भूषवले आहे. २०१७साली झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभा अध्यक्षानंतर आता विरोधी पक्षनेत्याची निवड होण्याची शक्यता

News Desk

#Elections2019 : जाणून घ्या…अकोला मतदारसंघाबाबत

News Desk

‘नमो अ‍ॅप’च्या माध्यमातून पंतप्रधान मोदी जाणून घेणार लोकांचा कौल

News Desk