HW News Marathi
राजकारण

सिग्नेचर पुलाच्या उद्घाटना वेळी मनोज तिवारींची मुजोरी

नवी दिल्ली | सिग्नेचर पुलाचे उद्घाटन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते झाले आहे. मात्र. या उद्घाटनआधीच भाजप आणि आपच्या कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद झाला आहे. हा पुल ५ नोव्हेंबरपासून सर्वसामान्यासाठी खुला होणार आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी त्यांच्या समर्थकांसह सिग्नेचर पुलाच्या उद्घाटनस्थळी दाखल झाले.

 

यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली. त्यानंतर भाजप आणि आपचे कार्यकर्ते परस्पर भिडले. मला ज्या पोलिसांनी पोलिसांना धक्काबुक्की केली आहे. मी त्यांची तक्रार मी केली असून मी त्या सर्वांना ओळखले आहे. येत्या चार दिवसात मी सांगेन की, पोलिसांनी काय असे ती, अशा शब्दात मनोज तिवारी यांनी भाजप आणि पोलिसांना धमकी दिली आहे.

यावेळी मनोज तिवारी म्हणाले की, सिग्नेचर पुलाच्या कामाला दुसऱ्यांदा मी सुरुवात केली असल्याचे विधान केले. मात्र, अरविंद केजरीवाल यांनी पुलाच्या उद्धाटनाचे आयोजन करत आहेत, असा आरोप तिवारी यांनी केला आहे.

मला सिग्नेचर पुलाच्या उद्धाटन कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले होते. आणि मी या परिसराचा खासदार आहे. त्यामुळे मी सिग्नेचर पुलावर आलो आहे. तसेच मी काय गुन्हेगार आहे का?, मी अरविंद केजरीवाल यांचे स्वागत करण्यासाठी आलो आहे, असे तिवारी यावेळी पत्रकाराशी बोलताना सांगितले.

तब्बल १४ वर्षानंतर सिग्नेचर पूलाचे बांधकाम पूर्ण झाले असून या पुलासाठी जळपासू १५०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. दोन लिफ्ट बसविण्याचे काम अद्याप बाकी आहे. लिफ्टच्या आधारे लोक १५४ मीटर उंचावर जाऊन संपूर्ण दिल्ली पाहू शकणार आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी विरोधी एकजुटीचा ट्रेलर लॉन्च

News Desk

कर्नलसह चार जवान शहीद, शिवसेनेची सरकारवर टीका

News Desk

मनसेला 12 वर्षे पूर्ण, पक्ष टिकवण्याचे राज ठाकरेंपुढे आव्हान

News Desk