HW News Marathi
राजकारण

गरीबांचा विचार भाजप करत नाही | उद्धव ठाकरे

मुंबई | कर्नाटक मध्ये 116 आमदार असणाऱ्या काँग्रेस-जेडीएसला डावलून बहुमत गाठिशी नसणाऱ्या भाजपाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण देणाऱ्या राज्यपाल वजुभाई वाला यांचा गुरुवारी उद्धव ठाकरेंनी उल्हासनगर येथे झालेल्या सभेत चांगलाच समाचार घेतला. ‘राज्यपाल भारतीय जनता पक्षाचे नम्र सेवक आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात मंत्रिमंडळात राज्यपाल वजुभाईंनी १४ वर्षे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृपेनेच ते कर्नाटकच्या राज्यपालपदी बसले आहेत. त्यामुळे भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले असल्याचा आरोप यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. त्याचबरोबर सत्तेत आलेले भाजप सरकार गरीबांचा विचार करत नसल्याची टिकाही त्यांनी यावेळी बोलताना केली.

यावेळी बोलाताना उद्धव म्हणाले, भाजप कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे सरकार स्थापन करण्यासाठी अट्टाहास करत आहे तितक्याच मेहनतीने राम मंदिर का बांधत नाही ? येडियुरप्पांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून माझा राज्यपालांच्या पदावरचा विश्वास उडाला आहे. जर अशी लोकशाही भाजप देऊ इच्छित असेल तर आम्हाला अशी लोकशाही नको आहे. लोकशाहीमध्ये ज्या पक्षाकडे सर्वात जास्त आमदार किंवा खासदार असतात त्यांनाच सरकार प्रस्थापित करण्याची संधी दिली जाते. परंतु कर्नाटक निवडणुकीत हे कुठेच पहायला मिळाले नाही.

https://www.facebook.com/hwmarathi/videos/464283637338438/

हिंदुत्व हे भाजपाला फक्त निवडणुक काळातच आठवते मात्र एकदा निवडणुक झाल्यानंतर ते कोणासोबतही सरकार बनवायला तयार होतात. मग ते मुफ्ती असतो किंवा अजून कोणी असो. पण आज लोकसभा किंवा विधानसभा कोणतीही निवडणुक झाली किंवा दुन्ही एकसाथ झाली तरीही शिवसेना निवडणुक लढायला आणि जिंकायला तयार आहे असे म्हणत कर्नाटक के राज्यपाल वजुभाई वाला पुर्वी कोण होते हे जनतेने जाणून घेण्याची गरज आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणालेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय क्षमता आहे, हे सर्वांना माहित आहे | नितेश राणे

News Desk

कवी छगन भुजबळ,वाचा सविस्तर…

swarit

OBC आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा! दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा – सर्वोच्च न्यायालय

Aprna