HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

भाजपने धनगर समाजाला सर्वाधिक न्याय दिला | चंद्रकांत पाटील

मुंबई | “भाजपने धनगर समाजाला सर्वाधिक न्याय दिला आहे. महादेव जानकर, विकास महात्मे यांच्यासारख्या धनगर समाजच्या नेत्यांना केवळ भाजपनेच संधी दिली आहे. गोपीचंद पडळकर यांना भाजपने आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर दिली होती. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. आता मात्र ते आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत आहेत. ही बंडखोरी कशासाठी ?”, असा सवाल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील केला आहे.

भाजपने गोपीनाथ पडळकर यांना नेमकी कोणती अशी मोठी ऑफर दिली आणि का दिली ?, याबाबत मात्र चंद्रकांत पाटील यांनी गुप्तता पाळली आहे. “भाजप-शिवसेना युतीने कायमच सामान्य लोकांना मोठे केले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी फुटपाथवर झोपणाऱ्या नारायण राणे यांना राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचविले. भाजप-शिवसेना युतीशिवाय अशी संधी कोणताही पक्ष, कोणतेही सरकार देणार नाही, असा दावाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला आहे.

Related posts

गेल्या ५ वर्षांत मोदींनी देशाची वाट लावली, पुढेही तेच करतील !

News Desk

जाणून घ्या… कर्जत जामखेडामधून रोहित पवार निवडणूक का लढणार

विधासभा निवडणुकीच्या निमित्ताने जनतेला काँग्रेसच्या युवा चेहऱ्यांची ओळख

अपर्णा गोतपागर