HW Marathi
राजकारण

भाजपने वरिष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर आता स्टार प्रचारकांच्या यादीतूनही वगळले

नवी दिल्ली | भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांसारख्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर आता भाजपने त्यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून देखील बाद केले आहे. भाजपने उत्तर प्रदेशसाठी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी या ज्येष्ठ नेत्यांची नावे वगळण्यात आली आहेत. दरम्यान, भाजपच्या या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा समावेश आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी आजच (२६ मार्च) स्वतः असे जाहीर केले की, भारतीय जनता पक्षाने त्यांना आगामी लोकसभा निवडणुका लढविण्यास नकार दिला आहे. मुरली मनोहर जोशी यांनी त्यांना मतदारसंघातील मतदारांना उद्देशून लिहिलेल्या नोटिशीत असे स्पष्ट केले आहे कि, “कानपूरच्या प्रिय मतदारांनो, भाजपचे सरचिटणीस श्री रामलाल यांनी आज मला असे सांगितले आहे की मी कानपूर किंवा इतरत्र कुठूनही आगामी लोकसभा निवडणुका लढू नये.” त्याचप्रमाणे, लालकृष्ण अडवाणी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या गांधीनगरमधून अमित शाह यांना उमेदवारी देत भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली.

भाजपच्या उत्तर प्रदेशमधील स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहराज्य मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, उमा भारती, पीयूष गोयल, स्मृती इरानी, हेमा मालिनी, मनोज तिवारी, कलराज मिश्र आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावांचा समावेश आहे.

Related posts

शरद पवार योग्य बोलतात, त्यांचे घर पैशाने भरलेले !

News Desk

उदयनराजे यांची भाजपमध्ये वापसी ? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

Gauri Tilekar

केंद्राच्या ‘अरे’ला ममता ‘का रे’ने प्रत्युत्तर दिले !

News Desk