HW Marathi
राजकारण

भाजपला काँग्रेस मुक्त नाही, तर मुस्लिम-मुक्त भारत पाहिजे !

बहादुरपुर ।  ‘भाजपला काँग्रेस मुक्त नाही,तर मुस्लिम-मुक्त भारत पाहिजे’,अशा शब्दात एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.  तेलंगणाच्या बहादुरपूरमधील निवडणुकीच्या प्रचारामध्ये ओवैसी बोलत होते.अमित शहा तेलंगणात म्हणाले होते की, ‘हैदराबादला मशिद मुक्त करू’ शहा यांच्या या विधानाचा ओवैसी यांनी खरपूस समाचार घेतला.

ओवैसी पुढे असे देखील म्हणाले की, ‘भारतातील मुस्लिमांसह अल्पसंख्याकांना भाजपकडून घाबरवण्याचा आणि त्यांना दडपण्याचा प्रयत्न होत आहे’.”भाजप काही प्रमाणात तेलंगणा साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण निवडणुकीत ते हरवले जातील,” असे वक्तव्य ओवैसी यांनी केले आहे.आंध्रप्रदेशमधून तेलंगणा वेगळे झाल्यानंतर तिथे पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. आता येथे टीआरएसची सत्ता आहे.

Related posts

अजितदादा जेव्हा सिंहासन नाकारतात तेव्हा.

Ramdas Pandewad

आव्हाडांनी का घेतली उद्धव ठाकरेंची भेट ?

मोदी सरकारच्या इराद्याला कोर्टाच्या निर्णयामुळे चाप | अशोक चव्हाण

News Desk