HW News Marathi
राजकारण

भाजप म्हणजे हिंदुत्त्व नव्हे, अयोध्येत उद्धव ठाकरेंनी साधला निशाणा

अयोध्या | “भाजप म्हणजे हिंदुत्त्व नाही. मी भाजप सोडले हिंदुत्त्व नाही”, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (७ मार्च) अयोध्येत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर बोचरी टीका केली आहे. “भाजप आणि हिंदुत्व हे दोघेही वेगवेगळे आहेत. मी भाजप सोडले आहे, हिंदुत्त्व नाही”, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रावादीच्या महाविकास आघाडी सरकारला नुकतेच १०० दिवस पूर्ण झाले आहेत. याच निमित्ताने, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे हे श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब अयोध्येत दाखल झाले आहेत.

“आमचे सरकार किमान समान कार्यक्रमावर चालत आहे. आम्हा तिन्ही पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. भाजपने चिंता करू नये आमचे सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल”, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. अयोध्येतील राम मंदिर निर्माणाविषयी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेना १ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने या ठिकाणी जागा देण्यास मंजुरी दिल्यास महाराष्ट्रातील रामभक्तांसाठी ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्याची इच्छा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलून दाखवली आहे.

२०१८ साली देखील उद्धव ठाकरे हे आपले पुत्र आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह अयोध्येत गेले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने त्या दौऱ्याचे आयोजन केले गेले होते. राम मंदिर हा शिवसेना आणि भाजप युतीचा महत्त्वाचा मुद्दा असल्याने लोकसभेपूर्वी उद्धव ठाकरेंनी अयोध्या वारी केली होती. दरम्यान, आजच्या मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याला मंत्र हिंदू महासभेने मोठा विरोध केला. सरकार स्थापन झाल्यापासून उद्धव यांच्या नियतीमध्ये फरक पडला. शिवाय ते मुस्लिमांना आरक्षण देत आहेत. या मुद्दयावरुन हिंदू महासभेने उद्धव ठाकरेंच्या अयोध्यावारीला विरोध दर्शवला होता .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार घेणार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक 

swarit

स्वबळाच्या नाऱ्याचा फटका शिवसेनेलाच ?

Gauri Tilekar

आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्र क्रांती सेनेचा भाजप-सेना युतीला पाठिंबा

News Desk