HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मी तयार | राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई | “यंदाच्या लोकसभेत मी भाजप-शिवसेनेचा उघडपणे प्रचार केला आहे. त्यामुळे, माझा भाजप प्रवेश हा काही मुद्दा राहिलेला नाही. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आणि मंत्रिपद कोणाला मिळणार हे मुख्यमंत्री ठरवतील. मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मी तयार आहे”, असे स्पष्ट विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. ते संगमनेरमध्ये बोलत होते. पुत्र सुजय विखे पाटील यांच्या प्रवेशानंतरपासूनच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी ४ मे रोजी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी पार पडलेल्या काँग्रेसच्या नाराज आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे या दिवशी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची देखील भेट घेतली. त्यानंतर ते आता लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा रंगू लागल्या होत्या.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याच्या काही दिवसांपूर्वी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे सोपविला होता. त्यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडून स्विकारण्यातही आला. त्यानंतर ४ जून रोजी राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपविला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रचारसभांचा खर्च सादर करावा, निवडणूक आयोगाची मनसेला नोटीस

News Desk

“…मिशा काय, भुवया पण काढून टाकेन”, उदयनराजेंचे शिवेंद्रराजेंना आव्हान

Aprna

मोदी विरोधी एकजुटीचा ट्रेलर लॉन्च

News Desk