HW News Marathi
राजकारण

उर्फी जावेदच्या वादात सुषमा अंधारेंच्या फेसबुक पोस्टला चित्रा वाघांचा ट्वीटद्वारे पलटवार

मुंबई | बिग बॉस फेस उर्फी जावेद (Uorfi Javed) ही वेगवेगळ्या वेशभूषेमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. उर्फी जावेदच्या वेशभूषेवरून राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सर्व प्रथम उर्फी जावेदच्या कपड्यांवर आक्षेप घेतला. तर चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर कारवाई करावी, असे निवेदन त्यांनी मुंबई पोलिसांना दिले होते. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उर्फी जावेदच्या समर्थनात फेसबुक पोस्ट लिहिला असून आता या प्रकरणाला भाजप विरूद्ध ठाकरे गट असा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

” उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत , केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का ?”, असा सवाल करणार फेसबुकवर पोस्ट शेअर करत सुषमा अंधारेंनी या वादात उडी घेतली आहे. यानंतर सुषमा अंधारेंच्या फेसबुक पोस्टवरून चित्रा वाघ यांनी ट्वीट करत पलटवार केला आहे. “व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार कदापी खपवून घेतला जाणार नाहीच समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो एव्हढी सदिच्छा आहे”, असा टोला चित्र वाघ यांनी सुषमा अंधारेंना ट्वीट करत लगावला आहे. चित्र वाघ यांनी पाच ट्वीट करत सुषमा अंधारेंवर निशाणा साधला.

चित्र वाघ यांनी ट्वीटमध्ये म्हणाले,  “आपल्या कामाची गरज म्हणून कोणाचा पेहराव तसा असेल तर तो झाला कामाचा भाग यावर माझा किंवा कोणाचाही आक्षेप असायचं कारण नाही पण जिथे आपण समाजात वावरतो,सार्वजनिक ठिकाणी भर वस्ती आणि रस्त्यावर खुल्या वातावरणात आपला पेहराव व्यवस्थित राखणं हे सामाजिक भान आहे.” दुसऱ्या ट्वीटमध्ये चित्र वाघ म्हणाल्या, “तो जर राखला जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये ? व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान नं राखता,त्याचा अतिरेक करणाऱ्यांना रोखणं,हा ही धर्म नाही का ? लेकी-बाळी तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहे, त्यांच्यासमोर असे आदर्श असावेत का ? ..”

तिसऱ्या ट्वीटमध्ये चित्र वाघ म्हटले, “स्री शिक्षित व्हाही,सक्षम व्हावी,यासाठी लढा देणाऱ्या सावित्रीमाईंनाही स्वैराचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अश्या लेकी अभिप्रेत होत्या का ? जिथे समाजस्वास्थ्य महत्वाचं, तिथे राजकारण करण्याची गरज आहे का ?” चित्र वाघांनी चौथ्या ट्वीटमध्ये म्हणाल्या, “माझं आवाहन आहे की हे असे उपदव्याप रोखण्यासाठी एक होऊ या.. छत्रपतींचा आदर्श,सावित्रीचे संस्कार जपू या.. खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणाचा जागर करू या.. हा विषय वाद अथवा राजकारणाचा नक्कीच नाही तर सामाजिक स्वास्थ्य जपण्याचा आहे,ही फक्त माझीच नाही तर आपली सगळ्यांचीच जबाबदारी नाही का?”

चित्र वाघ यांनी पाचव्या ट्वीटमध्ये म्हणाल्या, “व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार कदापी खपवून घेतला जाणार नाहीच समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो एव्हढी सदिच्छा आहे.” असे ट्वीट करत हॅशटॅग #सामाजिकभान #स्वैराचारालाविरोध दिले आहे.

सुषमा अंधारेंनी फेसबुकवरील पोस्टमध्ये नेमके काय लिहिले

मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट.
पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो. किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. उदाहरणार्थ टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा इतकच…
अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी ?
उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?
आणि जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत , केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का ? किंवा त्यांना ( म्हणजे केतकी चितळे, कंगना राणावत किंवा अमृता फडणवीसयांना ) मारहाणीची भाषा कराल का?
नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्या साठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल.
#सत्तेचा_माज #arrogance

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांच्या शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर

News Desk

मुंबईत शिवसेनेला जोरदार झटका शिवसेनेचे वाघ मनसे मध्ये

News Desk

उद्यापासून पित्रोदा यांनी ‘सामना’ वाचायला सुरुवात करावी !

News Desk