HW News Marathi
राजकारण

चित्रा वाघ यांनी नाना पटोलेंचा ‘हा’ आक्षेपार्ह व्हिडीओ केला ट्वीट; “काय नाना…..तुम्ही पण…”

मुंबई | भाजपच्या नेत्या चित्र वाघ यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक अक्षेपार्ह व्हिडीओ ट्वीट केला आहे. चित्रा वाघ यांनी ट्वीट केलेल्या व्हिडिओला “काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं…”, अशी कॅप्शन दिली आहे. आणि नाना पटोले, काँग्रेस, महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसला टॅग केले आहे. “लोकप्रतिनिधीकडून लोकांनी काय बोध घ्यावा. हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आहे,” असा सवाल उपस्थित करत पटोलेंवर टीका केली.  भाजपच्या श्रीकांत देशमुख यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काल (19 जुलै)  शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचाही एका महिलेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर चित्रा वाघ यांनी नाना पटोलेंचा व्हिडिओ आज (20 जुलै) ट्वीट करत पत्रकार परिषदेतून त्यांच्यावर टीका केली.

चित्रा वाघ म्हणाले, “एखाद्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात डोकाने किंवा ट्वीट करणे तुम्हाला योग्य वाटते का?, पत्रकारांच्या प्रश्नावर चित्रा वाघ म्हणाल्या, “सोलापूर असो, रायगड असो, कुठलाही पक्ष असू दे, नाना पटोले असू दे किंवा आणखी कोणी असू दे. ज्या वेळेला तुम्ही लोकप्रतिनिधी असतात, त्या ठिकाणी बसता, तुमची जबाबदारी कितेक पट्टीने वाढलेली असते. ज्या वेळेला अशा काही गोष्टी होतात. अशा वेळी आमच्या हाता ज्या गोष्टी असतात, त्या गोष्टी निश्चित पणे आम्ही करतो. आमच्या पक्षाला कळाले, तेव्हा आम्ही तात्काळ दखल घेत. त्या ठिकाणी राजीनामे घेतले. परंतु, तरी सुद्धा टीकेची झोड जी आहे. ती कुठे कमी होताना दिसत नाही. आणि त्यामध्ये हे सगळेच आले. जितके सत्ताधारी, विरोधक सगळेच जण हे त्याबाबतीत प्रश्न उपस्थित करत असतात. पण, मला तुम्हाला सांगायचे आहे की, आपल्या सर्वांच जबाबदारीने वागायचे आहे. आणि अशा पद्धतीने लोकप्रतिनिधीकडून लोकांनी काय बोध घ्यावा. हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आहे.”

 

पिडितांनी पुढे यावे, पोलीस स्टेशन ठिकाणी तक्रार करावी, चित्रा वाघ यांचे आवाहन

“भाजप असेल किंवा सगळेच राजकीय पक्ष या ज्या काही 8-10 दिवसात पुढे आल्या. त्यावेळेला ज्या पद्धतीने ट्रोल केले गेले, ज्या पद्धतीने पक्षाला विचारले गेले. हे मला वाटते कुठे तरी चुकीचे आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी कुठला पक्ष त्या ठिकाणी सांगत नसतो. परंतु, जेव्हा या गोष्टी आमच्यासमोर येतात. तेव्हा आमच्यासारख्यांना प्रश्न विचारले जातात. चित्राताई तुमचे आता म्हणे काय? , तुम्ही आता शांत का आहात?, आम्ही नेहमी म्हणतो की, आशा ज्या काही पिडिता आहेत. त्या पिडितांनी पुढे यावे. पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार करावी. निश्चित पणे दखल घेतली जाईल आणि ती कारवाई देखील होईल. आज या सगळ्या घडामोडीनंतर नानाचा जो आलेला व्हिडिओ आहे. तो तसे पाहिले तर धक्कादायक आहे,” असे आवाहन चित्र वाघ यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ११ नोव्हेंबरला चक्काजामचा इशारा

Gauri Tilekar

Shekhar Gore Exclusive | मला आताच आमदार झाल्यासारखं वाटतंय !

News Desk

मोदी सरकार विरोधात अण्णांचे उपोषण

News Desk