HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

भाजपच्या नेत्यांचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत !

मुंबई | “राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी आम्हाला कोणतेही प्रयत्न करण्याची गरज नाही. आपापसातील विसंवादामुळे हे सरकार स्वतःच पडेल. त्यानंतर, राज्यात मध्यावधी निवडणूक होईल. राज्याच्या मध्यावधी निवडणुकीत आम्ही एकटे लढू आणि जिंकूसुद्धा”, असा स्पष्ट दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे वारंवार करताना दिसत आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केले. “भाजपचे नेते अशा वलग्ना करतच राहतील. मात्र, या सरकारला तसा कोणताही धोका नाही, असे मला वाटतं. भाजपचे हे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत”, असे राजू शेट्टी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

“विद्यमान सरकारच्या कार्यपद्धतीवर मी फार समाधानी आहे, असे नाहीच. पण म्हणून महाविकासआघाडीचे हे सरकार पडून भाजपच्या नेत्यांचे मनसुबे पूर्ण होतील असे मला वाटतं नाही. ते आता अशीच स्वप्न पाहत राहतील. कारण, ते आज सर्वसामान्य जनतेपासून बरेच दूर गेले आहेत. त्यांचे खरं स्वरूप, खरा चेहरा आता जनतेला कळलेला आहे. देशभरात सीएए-एनआरसीला होणार विरोध, प्रचंड वाढलेली महागाई, गॅस दरवाढ, बेरोजगारी अशा असंख्य समस्यांमुळे देशातील शेतकरी, कामगार, महिला, युवा, उद्योजक, विद्यार्थी असे सर्वच जण त्यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे आता ते जनतेपासून फार लांब गेले आहे”, असे राजू शेट्टी म्हणाले.

“भाजपची फसवणूक करून फक्त सत्तेसाठी आणि पदासाठी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राज्यात सरकार स्थापन केले. मात्र, हे सरकार फार काळ टिकणार नाही. या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात विसंवाद आहे. त्यामुळे राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे, राज्यात मध्यावधी निवडणूक होईल. या निवडणुकीत मात्र भाजप स्वतंत्र लढू. राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करू”, असा दावा भाजपकडून वारंवार केला जात आहे.

Related posts

केजरीवाल यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

News Desk

भाजप अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मातोश्री’वर दाखल

News Desk

‘घड्याळ’ असलेल्या अनेक हातांनी मला मदत केली | सुरेश धस

News Desk