HW News Marathi
राजकारण

पालिकेच्या मराठी शाळेच्या मुद्यावरून अमित साटम यांची शिवसेनेवर टीका

मुंबई | मुंबई महानगर पालिकेच्या मराठी शाळेच्या मुद्यावरून भाजपचे आमदार अमित साटम यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. यासंदर्भात साटमांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात साटमांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या 51 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

साटम पुढे म्हणाले, “बाळासाहेबांच्या पश्चात महाराष्ट्राची मायबोली असलेल्या ‘मराठी’भाषेला आज उतरती कळा लागली आहे. खासकरून स्वत:ला मराठी रक्षक म्हणून घेणाऱ्या सत्ताधारी सेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या शाळांना टाळे ठोकण्यात येत आहे. ‘रोज मरे त्याला कोण रडे?’ हाच दृष्टीकोनातून सत्ताधारी सेनेचा मराठी शाळांबाबत आहे का?, ” असा सवाल त्यांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांना केला आहे.

गेल्या वर्षी मी पत्र व्यवहार करुन आपले लक्ष या विषयाकडे वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावर न प्रतिक्रिया आली न कारवाई झाली. २०१२ – १३ मध्ये ३८५ मराठी शाळा होत्या. ८१ हजार १२६ विद्यार्थी होते. २०२१-२२ मध्ये शाळा फक्त २७२ उरल्यात आणि ३४,०१४ विद्यार्थ्यी तिथं शिक्षण घेतायेत. म्हणजेच गेल्या १० वर्षात ११० मराठी शाळांना टाळं लागलं आहे. ४७ हजार २०२ विद्यार्थ्यांवर शाळा सोडण्याची वेळ आल्याची माहिती समोर येतीये. एकीकडे सत्ताधारी सेना मराठी अस्मितेच्या बाता करून सत्तेचा मेवा उपभोगत आहे आणि दुसऱ्या बाजूला मराठी शाळांची व विद्यार्थ्यांची संख्या ५० टक्क्यांनी घसरतीये. मी आशा करतो की तुम्ही मराठी शाळांच्या परिस्थितीची गंभीर दखल घ्याल जेणेकरून भविष्यात आपल्याला वर्धापन दिन हा “foundation day” म्हणून साजरा करण्याची वेळ येणार नाही.

 

 

Related posts

अवनीच्या शिकारीवरून आता काँग्रेसचाही भाजपवर निशाणा

swarit

राज्यातील विधानसभेतील २० प्रमुख चुरशीच्या लढती

News Desk

मी भीमा कोरेगावला जाणारच !

News Desk