मुंबई | राफेल खरेदी कराराबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या आरोपांप्रकरणी राहुल गांधींच्याविरोधात भाजपकडून आज (१९ डिसेंबर) मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता. भाजपचे नेते आणि आमदार राज पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली आज भाजप कार्यकर्त्यांकडून मेट्रो सिनेमा ते काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
भाजप कार्यकर्त्यांच्या या मोर्चा दरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हे कार्यकर्ते कॉंग्रेस कार्यॉलयावर धडकले. या मोर्च्यामध्ये महीलांची संख्याही लक्षणीय होती. या मोर्चा दरम्यान भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अडविण्यात आले.
राफेल विमान खरेदी प्रक्रियेत कोणतीही अनियमितता नाही, असे स्पष्ट करत केंद्र सरकार खरेदी करत असलेल्या १२६ विमान खरेदी प्रक्रियेत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. राफेल करारा संदर्भात प्रत्येक लहान लहान गोष्टींची पडताळणी करणे न्यायालयाला शक्य नाही, असेही सर्वोच्च न्यायालायने स्पष्ट केले आहे.
दसॉल्ट एव्हिएशनने कंपनीनेही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. राफेल विमान घोटाळ्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या या निर्णयावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. मोदी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांमध्ये अजुन टायपिंग एरर झाल्याचं समोर येइल असा टोलाही राहुल गांधींनी लावला होता.
त्याचप्रमाणे दसॉल्ट एव्हिएशनने देखील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आपली प्रतिक्रिया दिली होती. “राफेलबाबत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी आम्ही समर्पित आहोत. रिलायन्स जॉइंट व्हेंचर तसेच पूर्ण पुरवठा साखळीद्वारे दसॉल्ट एव्हिएशन भारतात विमानांचे यशस्वी उत्पादन करण्याचा प्रयत्न करेल”, अशी प्रतिक्रिया दसॉल्ट एव्हिएशनने दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.