HW News Marathi
राजकारण

सर्वोच्च न्यायालयाकडून खासदार मनोज तिवारी यांची कानउघाडणी

नवी दिल्ली | “तुम्ही खासदार आहात म्हणून मनाला येईल तसे वागण्याची सूट तुम्हाला कोणीही दिलेली नाही”, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्ली भाजपचे अध्यक्ष व खासदार मनोज तिवारी यांची कडक शब्दात कानउघाडणी केली आहे. ईशान्य दिल्लीतील गोकुलपुर भागातील एका घराला न्यायालयाच्या आदेशानुसार सील ठोकण्यात आले होते. परंतु रविवारी भाजपचे अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांनी त्या घराचे सील तोडले. यावरून मनोज तिवारी यांना न्यायालयाने खडे बोल सुनावले आहेत.

खासदार मनोज तिवारी यांनी या घराचे सील तोडल्यानंतर आपल्या कृतीचे समर्थनही केले. तिवारी सील तोडत असल्याची दृश्ये वृत्तवाहिन्यांवरून दाखविण्यात आली होती. “याच भागात ज्यांना सील ठोकण्यात यायला हवे अशा एक हजार अन्य मालमत्ता असूनही त्या सोडून मुद्दाम या घराला लक्ष्य करण्यात आले आहे”, असे तिवारी यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना म्हटले आहे. “खासदार तिवारी यांनी ज्या घराचे सील तोडले त्याचा न्यायालयाच्या निकालाशी काहीही संबंध नाही. केवळ प्रसिद्धीसाठी न्यायालयाची देखरेख समिती हे सर्व करीत आहे,” असे तिवारी यांच्याच विधानाचे समर्थन करीत अ‍ॅड. विकास सिंग म्हणाले

तुम्हाला काही अडचण होती तर तुम्ही ते न्यायालयाच्या निदर्शनास आणायचे होते. तुम्ही खासदार असलात तरी तुम्ही मनाला येईल ते काहीही करू शकत नाही, या शब्दात न्यायालयाने खासदार तिवारी यांना सुनावले आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्लीतील अनेक ठिकाणांच्या येथील अनधिकृत बांधकामे व बेकायदा वापर होणाऱ्या जागांना सील ठोकण्यात येत आहे. दरम्यान, एका घराचे सील तोडल्याबद्दल न्यायालयाने मनोज तिवारी यांच्यावर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई केली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्ही सिलेक्टीव्हच ऐकता…”, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना टोमणा

Aprna

विरोधी पक्ष ‘मोदी हटाव’चे नारे देण्यात तर मी लोकहिताचे निर्णय घेण्यात व्यस्त !

News Desk

सरकारमधील मंत्र्यांची दालने म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे | धनंजय मुंडे

News Desk