नवी दिल्ली | उत्तर पश्चिम दिल्लीमधील विद्यमान भाजपचे खासदार उदित राज यांनी आज (२४ एप्रिल) काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजपने उत्तर पश्चिम दिल्लीमधून प्रसिद्ध गायक हंसराज हंस यांना उमेदवारी मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले उदित राज यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. आज काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर उदित राज यांनी भाजपवर तोफ डागत म्हणाले की, त्यांना दलितांची मते हवी मात्र दलित नेता नको, असा आरोप केला आहे.
BJP MP Udit Raj joins Congress party in presence of Congress President Rahul Gandhi pic.twitter.com/nkk09fPlD1
— ANI (@ANI) April 24, 2019
उदित राज यांनी ट्विट करून म्हटले होते की, मी तिकिटासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, नत्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही. तसेच त्यांनी म्हटले होते की, जर भाजपने तिकिट दिले नाही तर मी राजीनामा देईन. त्यांनी आपल्या ट्विटरवर आपल्या नावातून चौकीदार शब्ददेखील हटवला होता. परंतु, काही तासांनी पुन्हा चौकीदार उदित राज असे नाव लिहिले होते. आता काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या नावातून चौकीदार शब्द हटवला आहे.
दलित विरोधी (भाजपा) पार्टी को दरकिनार करते हुए, कांग्रेस पार्टी में शामिल हुआ।
दलितों का सम्मान करने वाली कांग्रेस पार्टी में शामिल होकर मेरा मन प्रसन्न हुआ।
अब होगा दलितों का सम्मान 23 मई भाजपा गई।#ModiNeverAgain#23_मई_भाजपा_गई pic.twitter.com/GIL6HpeDK4— Dr. Udit Raj (@Dr_Uditraj) April 24, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.