HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

सर्वोच्च न्यायालयात राज्याच्या सत्तांतरावर शिंदे गटाचा युक्तीवाद पूर्ण; उद्या पुन्हा होणार सुनावणी

मुंबई | राज्याच्या सत्तांतरवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) उद्या सुनावणी होणार आहे. शिंदे गटाकडून आज (15 फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद पूर्ण झाला आहे. ठाकरे गटाच्या मागणी सत्तांतर प्रकरण पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठाकडे राहणार की सता न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे जाणार, यावर उद्या (16 फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत ठरण्याची शक्तता आहे.

 

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत सुनावणी सुरू होती. सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी मंगळवारी युक्तीवाद केला. यानंतर आज शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकिल हरीश साळवे यांनी ऑनलाईन माध्यमातून युक्तीवाद केला. सत्तांतर पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठाकडे राहणार की सात न्यायमुर्तींच्या घटनापीठाकडे जाणार हे उद्याच ठरण्याची शक्यता वर्तवली जाते.

 

शिंदे गटाची बाजून मांडताना हरीश साळवेंनी सर्वोच्च न्यायालयात म्हटले, “उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणी होण्यापूर्वीच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणीसाठी बोलविले होते. महाविकास आघाडीची 28 जून रोजी बहुमत चाचणी होणार होती. परंतु, त्याआधीच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. जर उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला समारो गेले असते तर काही मुद्दे उपस्थित करता आले असते. यामुळे उद्धव ठाकरेंचा राजीनामा अवैध ठरविला ठरला असून या चर्चेला अर्थच उरत नाही. महाविकास आघाडी सरकार पडण्यामागे उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत,” असा युक्तीवाद त्यांनी केला.

Related posts

राज्यात 4 ते 6 सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

News Desk

“कमवतात इथे आणि पाठवतात पाकिस्तानला”; नाव न घेता साध्वी प्रज्ञा ठाकूर यांची शाहरुखवर टीका

News Desk

“आधी राष्ट्रवादीला बुडविण्याची भाषा, नंतर भुजबळांचा बाप काढला” शिवसेना खासदाराचा राग अनावर!

News Desk