नवी दिल्ली | मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी राहिलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपकडून भोपाळ येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तेव्हापासून साध्वी प्रज्ञासिंहसह भाजपवर सर्व स्तरातून टीका होत आहे. पक्षाच्या वतीने साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर कारवाई करण्याव्यतिरिक्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा त्यांची बचाव करत आहेत. अमित शहा यांनी म्हटले की “प्रज्ञा सिंह यांना खोट्या आरोपांखाली फसविले आणि जे आरोपी होते त्यांना मात्र सोडून दिले,” शहा यांनी कोलकाता येथील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरवर काँग्रेसच्या वतीने जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. ज्यावेळी बाटला हाऊसला चकमकीत मारले, त्यावेळी सोनियाजींना रडू कोसळले. मात्र, तेथे आपले एक शूर पोलीस निरीक्षक शहीद झाले, त्यावर सोनिया यांनी रडू आले नाही. यावर काँग्रेसने उत्तर दिले पाहिजे, असा शहा यांनी आरोप केला आहे.
Amit Shah in Kolkata, West Bengal: Batla House ka jab encounter hua, Sonia Ji ko rona aa gaya Batla House ke aatankwadiyon ke marne par, jabki apna ek bahadur Police Inspector waha shaheed ho gaya, uske mrityu par rona nahi aaya, is par Congress ko jawab dena chahiye pic.twitter.com/fFMtLXeJqS
— ANI (@ANI) April 22, 2019
स्वामी असीमानंद आणि अन्य लोकांवर खोट्या आरोपांखाली गुन्हे नोंद झाले. समझौता एक्स्प्रेसमध्ये स्फोट करणारे लोक कुठे आहेत. ज्या लोकांना पकडले त्यांना का सोडले, असा उलट सवाल अमित शहा यांनी उपस्थित केला आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीचे अस्तित्वचे संपले आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
Bharatiya Janata Party (BJP) President Amit Shah in Kolkata, West Bengal: The refugees who have come from Bangladesh, be it Hindus, Buddhists, Sikhs, Jains, or Christians, BJP has clearly signaled in its 'sankalp patra' that we will give them citizenship. pic.twitter.com/RUEO48jARE
— ANI (@ANI) April 22, 2019
बांगलादेशमधून जे हिंदू, बौद्ध, शीख, जैन आणि ख्रिश्चन निर्वासीत भारतात आले आहेत. त्यांना आम्ही नागरिकत्व देऊ. तसे स्पष्ट आश्वासन आम्ही भाजपच्या संकल्प पत्रातून दिले आहे, असेही शहा यांनी म्हटले आहे. निर्वासीतांनी काळजी करण्याचे कारण नाही. त्यासाठी पहिल्यांदा नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.