HW News Marathi
राजकारण

“… आमच्यासाठी दु:खद घटना”, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई। केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी (Election Commission ) शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव निवडणूक आयोगाकडून मिळाले आहे. परंतु, निवडणूक आयोगाने शिंदे गटाला अजून चिन्ह दिले नाही. उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह दिले आहे. तर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव दिले आहे. “आम्ही निवडणूक आयोगाकडे धनुष्यबाण चिन्ह मागितले होते. परंतु, आम्हाला ते मिळाले नाही. हे आमच्यासाठी दु:खद घटना आहे. कारण, ज्याच्याकडे विधीमंडळात आणि संघटनात्मक बहुमत असते,त्यांनी निवडणूक चिन्ह देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे”, अशी पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चिन्हासंदर्भात दिली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही अंधेरी पूर्व पोटनिवडणूक युतीने लढवणार आहोत. तर आम्ही निवडणूक आयोगाकडे धनुष्यबाण चिन्ह मागितले होते. परंतु, आम्हाला ते मिळाले नाही. हे आमच्यासाठी दु:खद घटना आहे. कारण, ज्याच्याकडे विधीमंडळात आणि संघटनात्मक बहुमत असते,त्यांनी निवडणूक चिन्ह देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. आमच्याकडे विधानसभा, लोकसभा, असे मिळून ७० टक्के बहुमत आहे.”
आमच्याकडे लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पंचायत समिती आणि जिल्हापरिषद सदस्य आहेत. एवढेच नव्हे तर देशातील १४ राज्यांच्या प्रमखांनी ही त्यांच्या राज्यातील शिवसेनेचे समर्थन आमच्याकडे आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना नाव दिले आहे. परंतु, तरी देखील आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळाले नाही. हा खरा आमच्यावर अन्याय आहे. याआधी निवडणूक आयोगाने मेरीटच्या आधारे निर्णय घेतले. तसाच आमच्या प्रकरणात देखील मेरीटच्या आधारे न्याय दिला पाहिजे”, असे माध्यमाशी बोलताना म्हणाले.

Related posts

डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आता गरिबांना घरे रिकामी करावी लागणार ?

News Desk

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार !

News Desk

EVMHacking : आगामी निवडणुकांसाठी ईव्हीएमचाच वापर केला जाईल !

News Desk