HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

शहांसाठी ठाकरे गुजरातमध्ये दाखल, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण

गांधीनगर | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे आज (३० मार्च) गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, गृहमंत्री राजनाथ सिंह, रामविलास पासवान हे नेते देखील गुजरातमध्ये दाखल दाखल झाले आहे. पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढविणारे अमित शहा अर्ज भरण्यापूर्वी रोड शो करणार आहेत.

तसेच शहा अर्ज भरण्यासाठी जातान जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी एनडीएच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. अर्ज भरण्यासाठी जाण्यापूर्वी अमित शहा यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. गांधीनगर हा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा हा पारंपारिक मतदारसंघ आहे. मात्र, अडवाणींना येथून उमेदवारी नाकारण्यात आली. आता अमित शहा येथून लढणार आहेत.

Related posts

आमच्याकडे सर्वच जण पंतप्रधान असतील !

News Desk

अखेर नोटबंदीच्या निर्णयाबाबत अरविंद सुब्रमण्यम यांनी सोडले मौन

News Desk

मासिकपाळीत महिलांच्या मंदिरप्रवेशाबाबत स्मृती इराणींचे अत्यंत वादग्रस्त विधान

Gauri Tilekar