HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे जाणार गुजरातला

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शनिवारी (३० मार्च) गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अमित शहा यांनी यासाठी उद्धव ठाकरे यांना गुजरातला येण्याचे आमंत्रण दिले होते. उद्धव ठाकरे यांनीही हे आमंत्रण स्वीकारले आहे. दरम्यान, अमित शाह उमेदवारी अर्ज भरण्याआधी गुजरात जोरदार शक्तीप्रदर्शन होणार असल्याची माहिती मिळत आहे. अमित शाह यांनी उद्धव यांना दिलेले आमंत्रण म्हणजे आपल्या मैत्रीचेही दर्शन घडविण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या गांधीनगरमधून अमित शाह आगामी लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. अमित शाह उद्या गांधीनगरमधून आपला उमेदवारी अर्ज भरतील. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी येथे शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे देखील उपस्थित असतील.

Related posts

…तर मी कधीच दुष्काळ निवारणाबाबतचा निर्णय घेतला असता !

News Desk

चिटफंड योजनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय

News Desk

‘कुठे आहेत नोकऱ्या?’ गडकरींना कॉंग्रेस अध्यक्षांचा सवाल

News Desk