HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

मुरली मनोहर जोशी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास भाजपचा नकार

नवी दिल्ली | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचे खासदार मुरली मनोहर जोशी यांनी आज (२६ मार्च) स्वतः असे जाहीर केले आहे की, भारतीय जनता पक्षाने त्यांना आगामी लोकसभा निवडणुका लढविण्यास नकार दिला आहे. मुरली मनोहर जोशी यांनी त्यांना मतदारसंघातील मतदारांना उद्देशून लिहिलेल्या नोटिशीत असे स्पष्ट केले आहे कि, “कानपूरच्या प्रिय मतदारांनो, भाजपचे सरचिटणीस श्री रामलाल यांनी आज मला असे सांगितले आहे की मी कानपूर किंवा इतरत्र कुठूनही आगामी लोकसभा निवडणुका लढू नये.”

मुरली मनोहर जोशी हे वाराणसी मतदारसंघातील विद्यमान खासदार होते. मात्र, २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांनंतर त्यांची जागा नरेंद्र मोदी यांनी घेतली होती. त्यामुळे मुरली मनोहर जोशी यांनी कानपूर लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या श्रीप्रकाश जयस्वाल यांचा २ लाखांहुनही अधिक मतांनी पराभव केला.

यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी आणि यशवंत सिन्हा यांच्यासारख्या पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांच्या वयाचे कारण देत त्यांना उमेदवारी न देता त्यांना ‘मार्गदर्शन मंडळा’त समाविष्ट केले आहे. हल्लीच भाजपने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे देखील तिकीट कापले आहे. अडवाणी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या गांधीनगरमधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून भाजपवर प्रचंड टीका देखील करण्यात आली.

Related posts

नो पॉलिटिक्स हिअर…जस्ट लाईफ !

News Desk

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा काॅंग्रेसला पाठिंबा

News Desk

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ‘तिरडी आंदोलन’ पेट्रोल-डिझेलच्या दर वाढीचा निषेध

News Desk