HW News Marathi
राजकारण

भाजप-शिवसेना युती मजबूत | उद्धव ठाकरे

मुंबई | “भाजप-शिवसेना युती मजबूत आहे. आमचं ठरलंय”, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर आता शिवसेना-भाजप विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान, विधानसभेच्या जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा मतभेद निर्माण झाल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहे. मात्र, तसे काहीही नसून आमची युती मजबूत असल्याचे शिवसेना पक्षप्रमुखांनी स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (६ मे) आपल्या १८ विजयी खासदारांसह कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले आहे.

उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह विजयी १८ खासदारांसह अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेला मिळालेल्या एकमेव केंद्रीय मंत्रिपदापासून विधानसभेच्या जागावाटपापर्यंत काही मुद्द्यांवर शिवसेना भाजपमध्ये मतभेद झाल्याची चर्चा होती. या सर्व चर्चांना उद्धव ठाकरेंनी पूर्णविराम दिला आहे. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले आहे. यावेळी भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त व चिंतामुक्त करणार !

News Desk

राणेंचा मंत्रीमंडळ प्रवेश लांबणीवर, हिवाळी अधिवेशनानंतर होणार मंत्रीमंडळ विस्तार

News Desk

“…उद्धव ठाकरेंचे अस्तित्व संपले”, नारायण राणेंची बोचरी टीका

Aprna