HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

भाजपने २००४ ची लोकसभा निवडणूक विसरू नये | सोनिया गांधी

रायबरेली |  उत्तर प्रदेशाच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघातून माजी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (११ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रायबरेली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून चौथ्यांदा आणि अमेठीमधून एकदा एकूण पाचवेळा लोकसभा निवडणूक लढविली आहे.अर्ज दाखल करण्यापूर्वी सोनिया गांधी यांनी मंदिरात पुजा व होम हवन केले आहे. यानंतर सोनिया गांधी यांनी शक्ती जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींना असे वाटत असेल की, ते अजिंक्य आहेत तर तो त्यांचा गैरसमनज आहे. मोदींनी २००४ विसरु नका, त्यात दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना देखील असेल वाटले होते. ते अजिंक्य आहेत. तेव्हा काँग्रेस निवडून आले,” असे शब्दात सोनिया गांधी यांच्यावर मोदींना निशाणा साधला. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले की,  मोदींनी पाच वर्षात जनतेला दिलेले आश्वासन देखील पाळले नाही. त्यामुळे त्यांना वाटते असेल की ते अजिक्य आहे. तर तो त्यांचा मोठा गैरसमज असल्याचे निकाल आल्यानंतर कळेल, असा विश्वास राहुल गांधी यांनी केला आहे.

तसेच राहुल गांधी पुढे असे देखील म्हणाले की, मोदींनी माझ्यासोबत खुली चर्चा करावी. तेव्हा तुम्हाला कळेल की ‘दुध का दुध और पानी का पानी’ यानंतर सर्व लोकांना कळेल की, ‘चौकीदार ही चौर है’ , असे म्हणत. राहुल गांधी यांनी मोदींना आवाहन केले आहे.

 

Related posts

राफेल करारासाठी रिलायन्सची निवड आम्हीच केली होती !

Gauri Tilekar

अहमदनगर-नाशिकवर अन्याय होऊ देणार नाही !

Gauri Tilekar

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ जाहीर

Gauri Tilekar