HW News Marathi
राजकारण

उदयनराजेंना भाजपची ऑफर?

सातारा | आगामी निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येक पक्ष पक्षबांधणी करत आहे. त्यातच आता लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपने ऑफर दिल्याची चर्चा आहे. याबाबत भाजपचे नेते पुरूषोत्तम जाधव यांनी उदयनराजेंना पत्र लिहिल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवावी, अशी ऑफर उदयनराजेंना देण्यात आली आहे.

यावेळी भाजपकडून निवडणूक लढवल्यावरच ते तिसऱ्यांदा खासदार होतील. याबाबत उदयनराजेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे जाधव यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MarathaReservation : आरक्षणाआधीच भाजपला श्रेय लाटण्याची घाई

News Desk

#LokSabhaElections2019 : राजू शेट्टी आघाडीसोबत राहणार

News Desk

राहुल गांधींचे मोदींना दोन प्रश्न

News Desk