HW Marathi
राजकारण

सेना-भाजपने राजकारणासाठी बाबासाहेबांचे नाव वापरले

मुंबई | सेना भाजपने राजकारणात दलित मतांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे स्वप्न दाखवत बाबासाहेबांच्या नावाचा वापर केला असल्याचा आरोप कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची घोषणा होऊन तीन वर्षे झाली मात्र आद्यप काहीच काम झालेले नाही.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे स्मारक बांधण्यासाठी दादरच्या इंदू मिल येथे प्रशस्त जागा असून देखील  गेल्या अनेक दिवसांपासून या स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात झाली नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी २०१८ साली हे स्मारक बांधण्यात येईल असे आश्वासन दिल्यामुळे पुन्हा एकदा दलित संघटना शांत झालेल्या आहेत.

सरकार फक्त आश्वासन देते प्रत्यक्ष कोणतेही काम करत नसल्याची टिका चव्हाण यांनी आंबेडकर जयंती दिवशी पत्रकारांशी बोलताना केली.  सध्याच्या काळात अनेक कारणांमुळे कायदा-सुव्यवस्था कोलमडली आहे आणि भाजपची त्याला मूक संमती आहे की काय असे वाटते असेही यावेळी चव्हाण म्हणाले.

Related posts

तुम्ही ‘त्यांच्या’ सगळ्या आचरट, बालिश चाळयांना पाठिशी घातले !

News Desk

आंध्रप्रदेशमध्ये सीबीआयला बंदी

News Desk

कोविडच्या परिस्थितीवरुन लक्ष हटवण्यासाठी अनिल देशमुखांच्या मागे सीबीआयचा ससेमिरा!

News Desk