मुंबई | राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना आता चांगलाच वेळ आला आहे. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज (१० नोव्हेंबर) मालाड येथील ‘रिट्रीट’ हॉटेलमध्ये शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक सुरु असताना दुसरीकडे ‘वर्षा’वर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यपालांकडून भाजपला दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणावर चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, आता पुन्हा संध्या ४ वाजता भाजपच्या कोअर कमिटीची आणखी एक बैठक पार पडेल. या बैठकीनंतर भाजप सत्तास्थापनेसंदर्भातील आपला निर्णय स्पष्ट करेल, अशी माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे, भाजप कोअर कमिटीच्या या पुढच्या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष आहे.
Sudhir Mungantiwar after BJP Core Committee meeting at the residence of Devendra Fadnavis: Governor has invited BJP to form the government because we are the single largest party. We'll meet at 4 pm again today & take the decision on Governor's invitation. #Maharashtra pic.twitter.com/NJzNmNYGFS
— ANI (@ANI) November 10, 2019
“आम्ही या विधानसभेत राज्यातील सर्वात मोठा, राज्यातील जनतेकडून बहुमत मिळालेला पक्ष ठरल्याने राज्यपालांनी आम्हाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. याच पार्श्वभूमीवर आमची ४ वाजता पुन्हा एक बैठक होणार असून या बैठकीत आम्ही राज्यपालांच्या निमंत्रणावर चर्चा करू आणि निर्णय घेऊ”, अशी माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप कोअर कमिटीच्या पहिल्या बैठकीनंतर दिली आहे. त्यामुळे, आता थोड्याच वेळात भाजपची सत्तास्थापनेसंदर्भातील भूमिका समोर येईल. सत्तास्थापनेसंदर्भात आता भाजप नेमकी काय भूमिका घेणार ? सत्तेपासून दूर राहणार कि राज्यपालांचे निमंत्रण स्वीकारुन बहुमत सिद्ध करणार ? याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.