HW News Marathi
राजकारण

रामदास पाध्यांच्या बोलक्या बाहुल्यांमधले तुम्ही अर्धवट राव तर नाही ना?

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरे करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह भाजप यांच्यात तोफ डागली आहे. राज ठाकरेंच्या जाहीर सभेत केलेले व्हिडिओ असे ३२ व्हिडिओ दाखवित भाजपवर आरोपाच्या फैऱ्या झाल्या आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज (२७ एप्रिल) रंगशारदा येथे मनसेच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ला भाजपने ‘आता बघाच तो व्हिडिओ’ने आरोपाचे खंडळ करत करणारे अनेक पुरावे देऊन राज ठाकरेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

जवानांच्या नावांनी राजकारण करत आहेत, असा मोदींवर आरोप आहे. खरा प्रश्न आणि खरं उत्तर ऐका मग तुम्हालाही प्रश्न पडेल काय बोलतो हा माणूस? व्हेरिफाईड इंटरव्ह्यूमधून काही मिळत नाही व्हिडीओ अर्धवट कापला. रामदास पाध्यांच्या बोलक्या बाहुल्यांमधले तुम्ही अर्धवट राव तर नाही ना? असा प्रश्न विचारत राज ठाकरे यांची खिल्ली उडविली. पुलवामा हल्ल्यावरून अमित शहा यांनी केलेल्या मृतांच्या दाव्यावरूनही त्यांनी अमित शहा यांच्या ट्विटची वेळ दाखविली. तसेच दहशतवाद्यांचा आकडा काही दिवसांनंतर मांडल्याचा खुलासा शेलार यांनी केला.

खोटे बोल रेटून बोल हे तुमच्याकडून महाराष्ट्र शिकतोच आहे. राज ठाकरे यांना ‘मित्रा तू चुकलास’ असा इशारा दिला. यावेळी त्यांनी पहिला व्हिडिओ राज यांच्या सभेतील राहुल गांधीना सत्ता देऊन पाहू या विधानाचा दाखविला. यानंतर अजित पवारांवर राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांनी कसे झापले याचा व्हिडिओ दाखविला. तसेच तेव्हा केलेली टीकाही त्यांनी दाखविली. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर राज ठाकरे यांनी मिमिक्री केलेल्या टीकेचे व्हिडीओ या रंगशारदामधील सभेवेळी दाखविण्यात आले.

 

आशिष शेलार यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • राज ठाकरेंनी ३२ दावे केले होते त्यातील १९ दाव्यांना भाजपने उत्तर दिले आहे
  • मनसे या पक्षाला निती नाही, धोरणं नाहीत कार्यक्रम नाही फक्त प्रतिक्रिया आहे क्रीया काही नाही
  • राज ठाकरे यांनी डीसेंबर २०१८ मध्ये भेटले असा दावा केला होते व त्या नंतर पुलवामा ॲटॅक झाला असं बोलले होते
  • अजित डोवाल यांनी पारीस्तानच्या सुरक्षा सल्लागारांना २०१७ डीसेंबर मध्ये भेटले होते ही भेट कुलभुषण जाधव यांचे प्राण वाचवण्यासाठी भेटले होते
  • रामदास पाध्यांच्या बोलक्या बाहुल्यांमधले तुम्ही अर्धवट राव तर नाही ना?
  • राज ठाकरे तुमच्या विपर्यासावर लोक भुलणार नाही
  • मोनिका मोरे सर्वप्रथम भाजप पुढे आले मनसे नाही
  • आम्ही चॅलेंज देतो नोटबंदीवर चर्चा करायला राज ठाकरेंसोबत तयार आहोत
  • घोटाळा म्हणत असाल तर उत्तर द्या परिणांमाबद्दल चर्चा करायला तयार आहोत
  • नोटाबंदीच्या आधी काळा पैसा बॅंकेत भरा कर भरा असं आवाहन पंतप्रधानांनी केले होते..झटका आला म्हणुन निर्णय नाही घेतला
  • आणि राज ठाकरे दत्तक गावाबद्दल बोलतायेत
  • ज्याने शिवाजी पार्कत १ झाड दत्तक घेतले नाही तो गाव काय दत्तक घेणार
  • मुस्कटदाबी कशाला म्हणतात हे आम्हाला राज ठाकरेंनी शिकवू नये
  • खोट बोल पण रेटून बोल हे राज ठाकरेंकडून महाराष्ट्र शिकतोय
  • मला एकच खंत वाटतेय त्यामुळे मला एकच खंत वाटतेय “मित्रा तु चुकलास
  • ३२ पैकी १९ दावे दाखवणार आहोत वेळेची मर्यादा आहे
  • तुमचा प्रयत्न फसला तुमची आज पोलखोल करत आहोत
  • ज्या बातम्या दाखवले गेल्या त्या बातम्या पूर्ण दाखवल्या नाहीत
  • राज ठाकरेंनी खोटे दावे केले पुरावे दाखवले नाहीत
  • आम्ही अभ्यास करून आलोय जे दाखवले गेले ते सणसणीत खोट आहेत ३२ दावे खोटे केलेत
  • गेले २० दीवस मनसे असत्य दाखवत आहेत
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील हे ‘स्थगिती सरकार’ फार काळ टिकणार नाही !

News Desk

पाकिस्तानच्या हातातील ‘कटोरा’ मात्र कायम राहिला !

News Desk

राज्यातील भीषण पाणीटंचाईवर उपाय म्हणून कृत्रिम पाऊस पाडणार

News Desk