नवी दिल्ली | “देशातील मुस्लिमांना कोणीही भाडेकरू म्हटलेले नाही. मात्र, जर ओवेसी वाट्याचीच भाषा करत असतील तर तो १९४७ सालीच मिळाला आहे. त्यामुळे विषय तिथेच संपला”, असे म्हणत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते माधव भंडारी यांनी एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर निशाणा साधला आहे. “देशातील मुस्लिम हे भाडेकरू नव्हे तर वाटेकरी आहेत”, असे वक्तव्य असदुद्दीन ओवैसी यांनी केले होते. त्यावर माधव भंडारी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Madhav Bhandari,BJP on Asaduddin Owaisi: Unhe soch samajh ke bolna chahiye. Unko kisi ne kirayedaar nahi kaha, lekin hissedari ki bhasha bolenge to hissedari 1947 mein de di toh maamla khatam ho gaya pic.twitter.com/8d9N1AtIUS
— ANI (@ANI) June 2, 2019
“लोकसभेत भाजपने ३०० जागा जिंकल्या म्हणजे मोदींना वाटत असेल कि आपण मनमानी कारभार करू शकतो, तर तसे होणार नाही. देशाच्या संविधानाने मुस्लीम समाजाला धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार दिले आहेत. भारतातील मुस्लीम हे देशाचे भाडेकरू नाहीत, वाटेकरी आहेत”, असे वक्तव्य ओवैसी यांनी केले होते. ओवैसी यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी देखील टीका केली होती. “काहींना आपली उपजीविका करण्यासाठी उगाचच बडबड करण्याची सवय असते”, असे नकवी यांनी म्हटले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.