HW Marathi
राजकारण

सत्तास्थापनेसाठी कुमारस्वामींच्या आमदारांना लाच देण्याची भाजपची नवीन खेळी

नवी दिल्ली | कर्नाटकात भाजप आणि काँग्रेसमध्ये सत्तास्थापनेसाठी नेहमीच रस्सी खेच सुरू असलेले चित्र दिसते. परंतु आता कर्नाटकातील सरकार पाडण्यासाठी भाजपच्या बड्या नेत्यांनी लक्ष घातले असून सत्ताधारी पक्षातील प्रत्येकी आमादारांना १० कोटी रुपये देऊन एकूण २०० कोटी रुपये देण्याची तयारी केली असल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारी (१० फेब्रुवारी) केला आहे. यासंदर्भात काँग्रेसकडून भाजपाचे नेते बी. एस. येदियुरप्पा यांची आमदारांना पैसे देण्याबाबतची ध्वनिफीत उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार पाडण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या प्रयत्नांचा पर्दाफाश झाला आहे. कर्नाटकातील काँग्रेसचे सरचिटणीस व कर्नाटकाचे प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. येडियुरप्पांनी प्रत्येक आमदाराला १० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे आणि त्यांनी मोदी-शहा यांचा हवाला दिला आहे. पंतप्रधान या प्रकरणात काय कारवाई करणार, असा सवाल काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला. आम्ही संसदेत सोमवारी (११ फेब्रुवारी) हा मुद्दा उपस्थित करणार आहोत, असेही ते म्हणाले.

 

 

 

Related posts

#LokSabhaElections2019 : भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, मोदी वाराणसीतून लढणार

News Desk

राहुल यांच्या मुंबई दौ-याला सुरुवात

News Desk

सिद्धिविनायक मंदीराच्या पोस्टल स्टॅम्पचे उद्घाटन

News Desk