नवी दिल्ली | कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या सरकारला मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी (१५ जानेवारी) २ अपक्ष आमदारांनी राज्यातील काँग्रेस-जेडीएस यांच्या आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. यामुळे कर्नाटकातील कुमारस्वामींचे सरकार धोक्यात आले आहे. एच. नागेश आणि आर. शंकर या दोन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
2 Independent MLAs, H Nagesh and R Shankar, withdraw their support from Karnataka govt. pic.twitter.com/C34u3BNFOb
— ANI (@ANI) January 15, 2019
“दोन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर काय संख्यबळ राहते? यामुळे आम्हाला फार फरक पडत नाही, मी निश्चिंत असून मला माझी ताकद माहिती आहे. सध्या प्रसार माध्यमांमध्ये जे सुरू असलेल्या चर्चेचा मी आनंद घेत असल्याचे कर्नाटकाचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले आहे”.
Karnataka CM HD Kumaraswamy on 2 Independent MLAs withdraw support from Karnataka government: If 2 MLAs withdraw their support, what will be the numbers? I'm totally relaxed. I know my strength. Whatever is going on in media in the past week, I am enjoying pic.twitter.com/vsmmbdBXSY
— ANI (@ANI) January 15, 2019
भाजप सरकारने कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपने १०४ आमदरांना हरियाणाच्या एका रिसॉर्टमध्ये ठेवले असल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यातील सरकार स्थिर असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. राज्यातील सरकार पाच वर्षेचा कालावधी पूर्ण करेल, असा दावा कर्नाटक सरकारमधील मंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला आहे.
Independent MLA, R Shankar: Today is Makar Sankranti, on this day we want a change in the govt. The govt should be efficient, so I am withdrawing my support (to the Karnataka govt) today. pic.twitter.com/LscHTp6gJZ
— ANI (@ANI) January 15, 2019
“आज संपूर्ण देशभरात मकरसंक्रांतीचा सण उत्साहत साजरा होत असताना, कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसचे सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू न शक्यल्यामुळे मी पाठिंबा काढून घेतला”, असल्याचे अपक्ष आमदार आर. शंकर यांनी सांगितले आहे.
H Nagesh, Independent MLA :My support to coalition govt was to provide good&stable govt which utterly failed. There's is no understanding among coalition partners. So, I decided to go with BJP to install stable govt & see that govt performs better than the coalition. #Karnataka pic.twitter.com/hcMnaXaHZd
— ANI (@ANI) January 15, 2019
“कर्नाटकात चांगली आणि स्थिर सरकार येण्यासाठी मी काँग्रेस-जेडीएसच्या आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता. कर्नाटक राज्यात भाजप स्थिर सरकार निर्माण करून शकते. त्यामुळे मी माझा पाठिंबा भाजपला देत असल्याचे अपक्ष आमदार एच. नागेश यांनी म्हणाले आहे.”
BJP's Ram Shinde on 2 Independent MLAs withdraw support from Karnataka govt: They must have thought that they should join BJP that received the mandate instead of those who formed unnatural alliance. I'm getting a feeling that Operation Lotus will be successful in the coming days pic.twitter.com/5D9P1DlrUH
— ANI (@ANI) January 15, 2019
महाराष्ट्राचे मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी तीन दिवसानंतर कर्नाटकात भाजपची सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच भाजपचे ऑपरेशन लोट्स नक्कीच यशस्वी होणार असल्याचा दावा शिंदेंनी केला आहे. कर्नाटकात भाजप हा मोठा पक्ष असल्यामुळे आमचीच सरकार स्थापन होणार असल्याचे ते म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.