नवी दिल्ली | कर्नाटकमध्ये जेडीएस-काँग्रेस युतीचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या सरकारला मोठा धोका टळला आहे. अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर कर्नाटकातील एकच खळबळ माजली होती. यानंतर भाजपने पुन्हा सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. परंतु माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी काँग्रेसच्या आमदारांना फोडण्यास तयार करू शकले नाही. त्यामुळे भाजपचे कर्नाटकातील ऑपरेशन लोटस ३ फेल झाले आहे.
भाजपच्या अपयशनंतर काँग्रेसने आज (१८ जानेवारी) विधिमंडळाची बैठक सुरू आहे. या बैठकीत काँग्रेसचे नाराज आणि असंतुष्ट आमदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीसाठी काँग्रेसने त्यांच्या आमदारांना विधिमंडळाच्या उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केली आहे.
Karnataka Deputy CM G Parameshwara: Yeddyurappa is president of BJP, he need not worry about Congress MLAs, all of our MLAs will attend the CLP meeting. The pathetic thing is that BJP stooped to this level, they approached our MLAs & are still doing it but they'll not succeed. https://t.co/63f7RPTXkz
— ANI (@ANI) January 18, 2019
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वरम यांनी म्हणाले की, काँग्रेस विधिमंडळाची बैठक सिद्धरामय्या यांनी बोलावली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणूक आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा होणार आहे. भाजपही या बैठकीवर लक्ष ठेवून असून या पार्श्वभूमीवर बोलताना भाजप नेते येडियुराप्पा यांनी म्हटले आहे की, काँग्रेस विधिमंडळाच्या बैठकीबाबत मी कशाला चिंता करू, आमच्या १०४ आमदारांना आमच्या पक्षाबद्दल चिंता वाटते आणि आम्ही आता लोकसभेची तयार करत आहोत.
BS Yeddyurappa, BJP: I'm not bothered about their CLP meeting, that is left to Congress and JDS, why should I comment about it? They're telling many things, I'm not responsible for that. Our 104 MLAs are worried about our party and preparing for Lok Sabha elections. pic.twitter.com/VMcn3RQHZH
— ANI (@ANI) January 18, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.