HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

भाजपकडून ‘देशभक्ती’ हा निवडणुकीचा मुद्दा बनविला जात आहे !

नवी दिल्ली | काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी शनिवारी (६ एप्रिल) पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपकडून देशभक्ती हा निवडणुकीचा मुद्दा बनविला जात आहे. गरिबांशी आणि शेतकऱ्यांशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांकडे मात्र भाजपकडून हेतुपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे देखील प्रियांका गांधी यावेळी म्हणाल्या. “देशभक्तीचा मुद्दा उचलून धरला जातो. मात्र देशातील शेतकरी, बेरोजगारी आणि महिलांच्या सुरक्षेसारखे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मागेच राहतात”,असे प्रियांका गांधी यावेळी म्हणाल्या.

“असा कोण आहे जो देशभक्त नाही ? सर्वच जण देशभक्त आहेत. लोकशाहीवर विश्वास म्हणजे सर्वात मोठी देशभक्ती आहे. सजग, जागरूक राहणे ही सर्वात मोठी देशभक्ति आहे”, असेही प्रियांका गांधी यावेळी म्हणाल्या.नोटबंदीच्या दरम्यान लोकांना बँकांच्या रांगांमध्ये उभे राहण्यास सांगितले गेले आणि ही देशभक्ती आहे यामुळे काळा पैसा परत येईल, असे सांगण्यात आले. काळा पैसा परत आला का ?, एकही पैसा परत आला नाही मात्र जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागला.

Related posts

मुख्यमंत्र्यांची विखे-पाटील यांना अवमानता नोटीस

News Desk

RamMandir : उद्धव ठाकरे फैजाबाद विमानतळावर दाखल

News Desk

भाजपची जळगावातील उमेदवारी उन्मेष पाटलांना, स्मिता वाघचा पत्ता कट

News Desk