HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

मोठी बातमी! संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची युती

मुंबई | शिवसेना कुणाची?, धनुष्यबाण कुणाचं? याबाबतचा निर्णय अद्याप कोर्टात प्रलंबित असताना शिवसेनेतून आता मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. संभाजी ब्रिगेड आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आता युती करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवार, 26 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली आहे. या निर्णयामुळे आता राज्यातील राजकारणाची समीकरणं आता बदलताना पाहायला मिळत आहे.

एकनाथ शिंदेंनी साथ सोडल्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी मोठा निर्णय घेत संभाजी ब्रिगेडचा हात धरला आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र रिंगणात उतरणार आहेत. आज मातोश्रीवर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते सुभाष देसाई हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी सुभाष देसाई म्हणाले की दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक समन्वय समिती देखील नेमण्यात येणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईकरांना आता मिळणार समुद्राचे गोड पाणी, एक लिटरसाठी होणार ४ युनिट वीज खर्च!

News Desk

कोरोना बाधित पत्रकारांच्या उपचाराचा खर्च आणि नुकसान भरपाई माध्यम समुहांनी द्यावी

News Desk

दुसऱ्यांच्या मुलांचं बारसं करण्याची शिवसेनेला सवयच – राणे

News Desk