HW News Marathi
राजकारण

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची आपच्या महाराष्ट्राच्या संयोजक पदी निवड

मुंबई | ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र संयोजक पदी निवड करण्यात आली आहे. तर रंगा राचुरे यांना राज्याच्या सह-संयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच अजिंक्य शिंदे यांच्या खांद्यावर महाराष्ट्राच्या ‘युथ विंग’ची धुरा सांभाळण्याचे अव्हान दिले आहे. मुंबई येथील पत्रकार परिषदेत राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता ह्यांनी हि घोषणा केली आहे.

ब्रिगेडियर सुधीर सावंत हे आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक होते. महाराष्ट्र राज्यातील पक्षाची कार्यकारिणी आणि विविध समिती सदस्यांची घोषणा छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाने दिल्ली, हरियाना आणि पंजाबनंतर महाराष्ट्रात विस्तार करण्याचा निर्धार केला आहे.

१२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आम आदमी पार्टीचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिंदखेड राजा येथे येऊन जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर राज्यात आम आदमी पक्षाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर राज्याचे समन्वयक ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी प्रत्येक जिल्ह्यात बैठका घेऊन राज्यव्यापी दौरा केला होता. त्यानंतर बुधवारी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची आपच्या महाराष्ट्राच्या संयोजक पदी निवड करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या मागणीला राऊतसह कमलनाथ यांचा पाठिंबा

News Desk

भाजपने व्यक्तिगत टीका न करता आमच्याशी विकासाच्या मुद्द्यांवर बोलावे !

News Desk

छिंदम मारहाण प्रकरणी सेनेच्या नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल

News Desk