लखनऊ | उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन समाजवादी पार्टी प्रमुख मायावती आणि समाजवादी पार्टी अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आघाडी केली. बसपा आणि सपा उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी ७६ जागांवर लोकसभा निवडणुका लढविणार आहेत. आता उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात एकत्र लढणार असल्याची आज (२५ फेब्रुवारी) घोषणा केली आहे.
Bahujan Samaj Party (BSP) and Samajwadi Party (SP) to contest Lok Sabha elections in alliance in Madhya Pradesh. SP to contest on three seats and BSP to contest on rest of the seats. (file pic) pic.twitter.com/0UZXDlbGIB
— ANI (@ANI) February 25, 2019
मध्य प्रदेशात समाजवादी पार्टी फक्त तीन जागा तर बाकीच्या बहुजन समाज पार्टी लढवणार आहे. मध्य प्रदेशातील बालाघाट, टीकमगड, खजुराहो या तीन जागांवर समाजवादी पार्टीचे उमेदवार उभे करणार आहे. दुसरीकडे, उत्तराखंडमध्ये समाजवादी पार्टीने फक्त एकाच जागेवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तराखंडातील पौडी गढवाल मतदार संघातून समाजवादी पार्टी आपला उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहे.
मध्य प्रदेशात लोकसभेसाठी २९ जागा आहेत. तर उत्तराखंडमध्ये ५ जागा आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यातील प्रत्येकी ३८ जागा लढवणार आहेत. तर दोन जागा मित्रपक्षांना दिल्या जाणार आहेत. याशिवाय अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांमध्ये दोन्ही पक्ष उमेदवार देणार नाहीत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.