HW News Marathi
राजकारण

शिवसेना कोणाच्याही बापाची मक्तेदारी नाही !

बुलढाणा | गेल्या २ दिवसांपूर्वी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार विजय राज शिंदे यांनी एच.डब्ल्यू.मराठीशी बोलताना सांगितले होते की, “बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची शिवसेनेकडून उमेदवारी मागण्याचा पहिला अधिकार माझाच असून उमेदवारी मलाच मिळणार”, असा दावा केला होता. विजयराज शिंदे यांच्या या दाव्याचे आता बुलढाणा शिवसेनेतील दुसऱ्या म्हणजेच प्रतापराव जाधव यांच्या गटातील शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय गायकवाड यांनी खंडन केले आहे. “शिवसेना हा पक्ष बाळासाहेबांचा आहे ती कोणाच्याही बापाची मक्तेदारी नाही”, असे म्हणत संजय गायकवाड यांनी विजयराज शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. एच.डब्ल्यू. मराठीचे प्रतिनिधी शिवाजी म्हामणकर यांनी संजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधला तेव्हा बोलताना संजय गायकवाड यांनी असा आक्रमक पवित्रा घेतला.

शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून उमेदवारीसाठी दावा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेमधील अंतर्गत आता चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली आहे. बुलडाणा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड होता. मात्र या मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेमध्ये २ गट पडले. गेल्या 2014 च्या निवडणूकमध्ये शिवसेनेला या गटबाजीचा फटका बसला होता. त्यामध्ये मुख्यता एक गट होता शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे व दुसरा गट होता खासदार प्रतापराव जाधव व शिवसेना पदाधिकाऱ्यांचा. काहीच दिवसांपूर्वी शिवसेना नेते आदित्य ठाकरे याची जनआशिर्वाद यात्रा बुलडाणा येथे आली होती त्यावेळी या दोन्ही गटांनी काही अंतरावर आदित्य ठाकरेंसाठी २ स्वागत सभा काढल्या. त्यामुळे शिवसेना पक्षात दोन गट असल्याचे दिसून आले. हे दोन्ही गट विधानसभेच्या उमेदवाररीकरिता आग्रही आहेत.

भाजपकडूनही दावा

दरम्यान, विशेष म्हणजे या बुलढाणा मतदारसंघात शिवसेनेच्या या २ गटांसोबतच भाजपकडूनही या जागेवर दावा केला करण्यात आहे. गेल्या काही दिवसापासून बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेक घडामोडी घडत असून अनेक पक्षातील गटबाजीचे राजकारण मिळत आहे. काहीच दिवसांपूर्वी एच.डब्ल्यू.मराठीने ‘बुलढाण्यात शिवसेनेच्या गडावर भाजपचे अतिक्रमण’ ही बातमी केली होती. त्यात या जागेसाठी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय कुटे हे योगेंद्र गोडे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचे म्हटले होते. गेल्या कित्येक वर्षापासून ही जागा युतीच्या माध्यमातून शिवसेनेकडे आहे. मात्र यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय असलेले बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय कुटे यांनी योगेंद्र गोडे यांच्या उमेदवारीसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून ही जागा भाजपला मिळणार असल्याचे स्पष्टपणे त्यांनी जाहीर सभेत म्हटले होते.

बुलढाणा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार !

बुलढाणा मतदारसंघात भाजप करत असलेल्या दाव्याच्या या बातमीमुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली होती. मात्र बुलढाणाचे शिवसेनेचे खासदारप्रतापराव जाधव यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण दिले होते. “बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हा गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेकडे असून या ठिकाणी शिवसेनेकडून ४ वेळा उमेदवार निवडून आले आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेचीच राहील. मात्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे जो निर्णय घेतील तो सर्व शिवसैनिकांना मान्य राहील”, असे स्पष्ट केलय.

विधानसभेच्या तोंडावर बुलढाणा मतदारसंघाचा तिढा वाढला

गेल्या काही वर्षापासून युतीमध्ये बुलढाणा मतदारसंघात एकूण ७ मतदारसंघ असून त्यामध्ये ४ मतदारसंघात भाजपसाठी तर ३ मतदारसंघ शिवसेनेकडे सोडले जातात. मात्र या ३ जागांपैकी १ जागा देखील भाजप मागत असल्याने शिवसेनेला फक्त या मतदारसंघांमध्ये २ जागा राहतील. त्यामुळे शिवसेना या दोन जागा घेईल की संयुक्त लढेल ? असा प्रश्न निर्माण होत होता. मात्र, आता शिवसेनेतही २ गट असल्याने या २ गटांपैकी नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार ? हे गट निवडणुकीत एकमेकांना मदत करतील का ? किंवा या दोन्ही गटांना ही उमेदवारी न मिळत भाजपला मिळेल का ? असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत. त्यामुळे बुलढाणा मतदारसंघाचा तिढा आणखी वाढत चालला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज वैधच, फेटाळले सर्व आक्षेप

News Desk

शीख दंगली प्रकरणी सज्जन कुमार यांना जन्मठेप

News Desk

निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, हिंसाचारमुळे उद्यापासून पश्चिम बंगालमधील प्रचारबंदी

News Desk