HW News Marathi
राजकारण

…तरीही ते राफेलच्या मुद्द्यावर तज्ञ असल्यासारखे बोलतात !

नवी दिल्ली | “लोकसभेत भाजपचे ३०० खासदार असूनही त्यांना राफेल कराराबाबत आपली बाजू मांडण्यासाठी राज्यसभेतल्या माणसाची गरज पडते. अरुण जेटली हे संरक्षण मंत्रीदेखील नाहीत. तरीही ते या विषयातील तज्ञ असल्यासारखे बोलत आहेत”, असा टोला तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत राय यांनी केले आहे. अरुण जेटली यांनी आज (२ जानेवारी) राफेल करार मुद्द्यावरून सभागृहात स्पष्टीकरण दिले. अरुण जेटली यांच्या स्पष्टीकरणानंतर सौगत राय यांनी अरुण जेटली यांना हा टोला लगावला आहे.

पंतप्रधान मोदी अरुण जेटलींच्या पाठी लपतात. ते रामायणातील मेघनाद आहेत. अरुण जेटली हे राफेल करारातील तज्ञ असल्यासारखे संसदेत स्पष्टीकरण देतात. पंतप्रधान मोदींनी देखील संसदेचा सामना करावा, असे आव्हानही राय यांनी यावेळी दिले आहे. जेपीसीद्वारे राफेल कराराची चौकशी व्हावी त्याचप्रमाणे लढाऊ विमानांच्या किंमतीत झालेल्या वाढीमागचे कारण भाजपने स्पष्टीकरण करावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

राफेल विमान खरेदी करार घोटाळ्याबाबतची सर्व माहिती मनोहर पर्रीकर यांच्या बेडरुममध्ये असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. यासंदर्भातील गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची एक कथित ऑडिओ क्लिप काँग्रेसने प्रसिद्ध केली आहे. ज्या ऑडिओ किल्पमध्ये “राफेलबाबतची सर्व माहिती पर्रीकरांच्या बेडरुममध्ये आहे” असे अभिजीत राणे यांनी सांगितले आहे. काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या राफेल संदर्भातील कथित ऑडिओ क्लिपच्या मुद्द्यावरून आज सभागृहात मोठा गदारोळ झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

News Desk

इंग्रजांना जाऊन ७२ वर्षे झाली, आता त्यांचे प्रोटोकॉल बंद करा !

News Desk

“… माझ्यावर हल्ला करण्याचा कट”, संजय राऊतांचा गंभीर आरोप

Aprna