नवी दिल्ली | राजस्थान आणि तेलंगणामध्ये आज (७ डिसेंबर) सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत राजस्थानमध्ये २२ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. तर तेलंगणामामध्ये सकाळी ११ वाजपर्यंत २३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दरम्यान, राजस्थानात ४ कोटी ७४ लाख तर तेलंगणामध्ये २.८० कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
Voter turnout recorded till 11.00 am in #RajasthanElections2018 is 21.89%
— ANI (@ANI) December 7, 2018
Voter turnout recorded till 11.00 am in #TelanganaElections is 23.4%
— ANI (@ANI) December 7, 2018
राजस्थानात १९९ आणि तेलंगणामध्ये ११९ विधानसभेच्या जागांसाठी मतदान सुरु आहे. या निडणुकीसाठी राजस्थानमध्ये २२७४ आणि तेलंगणामध्ये एकूण १,८२१ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. या विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी ११ डिसेंबर रोजी होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.