HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : रणजितसिंह नाईक निंबाळकर देखील भाजपच्या गोटात ?

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशी राजकीय समीकरणे बदलत आहेत. आपला इच्छुक मतदारसंघ न मिळाल्याने अनेक नाराज उमेदवारांनी पक्षबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आता सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. निंबाळकर हे सध्या भाजपच्या संपर्कात असून लवकरच ते काँग्रेसला राम राम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बहुचर्चित अशा माढा मतदारसंघातून संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपकडून कोणता उमेदवार उभा केला जाणार याची प्रचंड चर्चा होती. दरम्यान, आता रणजितसिंह नाईक निंबाळकर हे लवकरच भाजपचा झेंडा हाती घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रचारसभांचा खर्च सादर करावा, निवडणूक आयोगाची मनसेला नोटीस

News Desk

#LokSabhaElections2019 : देशभरात कधी, कुठे होणार लोकसभा निवडणुका

News Desk

#LokSabhaElections2019 : काँग्रेस आज महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार

News Desk