HW News Marathi
राजकारण

राज्याचे मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत, ते पंचांग बघून मंत्रिमंडळ विस्तार करतील !

नाशिक | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत. पंचांग बघूनच ते मंत्रिमंडळाचा विस्तार करतील असे वक्तव्य शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले आहे. ते नाशिकमध्ये एका वृत्तवाहीनीशी बोलताना म्हणाले. राहू कोण, केतू कोण हे बघूनच मुख्यमंत्री मूहूर्त काढतील अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण आहेत. पंचागाच्या आधारे ते कधी मुहूर्त काढतात, यावर आता मंत्रिमंडळ विस्तार अवलंबून आहे. त्यांना लक्षात येईल राहू कोण, केतू कोण, त्यावर सर्व अवलंबून आहे. मागच्या विस्तारात माझा मंत्रिमंडळात समावेश झाला. आता त्यांच्या पक्षातील, त्यांच्या डोक्यातील कोण आहेत हे पाहावे लागेल.”

यावेळी बोलताना पाटील यांनी पेट्रोल दरवाढीवरुनही सरकारवर निशाणा साधला. आधी पेट्रोल पंपावरच्या पोस्टरवर मोदींसोबत वृद्ध स्त्री असायची, आता मॉडेल दिसते असेही ते म्हणाले. पेट्रोलचे दर गगनाला भिडले तरी लोक भाजपलाच पसंत करत आहेत अशी हतबलताही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या 15 व्या राष्ट्रपती पदाची घेतली शपथ

Aprna

#LokSabhaElections2019 : आज प्रकाश आंबेडकर सोलापूरातून भरणार उमेदवारी अर्ज

News Desk

#LokSabhaElections2019 : निवडणूक लढविण्याबाबत सलमानचा मोठा खुलासा

News Desk