HW News Marathi
राजकारण

…तोपर्यंत आम्ही कोस्टल रोडचे काम होऊ देणार नाही, मनसेचा इशारा

मुंबई | ‘जोपर्यंत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही कोस्टल रोडचे काम होऊ देणार नाही’, असा इशारा देत मनसे सैनिक आज (१४ जानेवारी) रस्त्यावर उतरले आहेत. “सोमवारपर्यंत बेस्टच्या संपाचा तिढा सुटला नाही तर सोमवारपासून ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ आपल्या संपूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरून मनसे स्टाईलने आंदोलन करेल. याची सर्व जबाबदारी राज्य सरकार आणि बेस्ट प्रशासनाची असेल”, असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला होता. त्याप्रमाणे आज बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या सातव्या दिवशी मनसैनिकांनी वरळी परिसरातील कोस्टल रोडचे काम बंद पाडले आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संप आज सातव्या दिवशी देखील सुरुच आहेत. अनेक बैठकांनंतर देखील अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही, अशी बेस्ट कर्मचाऱ्यांची ठाम भूमिका आहे. प्रशासन आणि बेस्ट कर्मचारी आपापल्या भूमिकांवर ठाम असल्याने यावर तोडगा काढणे कठीण होऊन बसले आहे.

काही दिवसांपूर्वी बेस्टचे शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘कृष्णकुंज’वर दाखल झाले होते. यावेळी राज यांनी त्यांना एकजूट कायम ठेवण्याचा सल्ला दिला होता. त्याचप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना आम्ही अखेरपर्यंत पाठिंबा असे म्हणत मनसेकडून पक्षाची अधिकृत भूमिका देखील स्पष्ट करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या ५६ विजयी आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक

News Desk

गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या | अशोक चव्हाण

News Desk

मी माझ्या घरातील मुलांचे बालहट्ट पुरवणार, दुसऱ्यांचे कशाला!

News Desk