HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

भिवंडीचे भाजप उमेदवार कपिल पाटील यांची उमेदवारी रद्द करा, काँग्रेसची मागणी

मुंबई | भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार कपिल पाटील यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. कपिल पाटील हे उत्तर भारतीयांना आमिष दाखवून आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचा आरोप काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जनरल सेक्रेटरी पंकज गायकवाड यांनी केला आहे. ‘तुम्ही मतदान करून गावी जा, तुम्हाला गावचे तिकीट देखील काढून देऊ’, असे आमिष कपिल पाटील हे उत्तर भारतीयांना आमिष दाखवत असल्याचा आरोप पंकज गायकवाड यांनी केला आहे.

“२९ एप्रिलनंतर गावी जा, मी तुम्हाला सर्वांना तुमच्या गावचे तिकीट काढून देईन”, असे आमिष पंकज गायकवाड यांनी उत्तर भारतीयांना दिले आहे. पंकज गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे कपिल पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आचारसंहितेचा उल्लघंन केल्याप्रकरणी कपिल पाटील यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा, अशी मागणी पंकज गायकवाड यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Related posts

#Election2019 : जाणून घ्या…चंद्रपूर मतदारसंघाबाबत

News Desk

सरकारच ‘नकारघंटा’ वाजवते तेव्हा काळ्या पैशाचे गूढ आणखीनच वाढते !

News Desk

पंतप्रधानांची मुलाखत म्हटल्यावर इतकी तर वाजणारच !

News Desk