HW News Marathi
राजकारण

“भूखंड घ्या… कुणी गायरान घ्या…”; सरकारविरोधात ‘मविआ’ची उपहासात्मक दिंडी

मुंबई | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. अधिवेशनाचा आज (27 डिसेंबर) सातवा दिवस असून अधिवेशनाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी विरोधकांनी राज्य सरकारविरोधात महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi)गजर आंदोलन करत उपहासात्मक दिंडी काढली. या दिंडीत महाविकास आघाडीचे आमदार सहभागी झालेले आहेत.  “भूखंड घ्या… कुणी गायरान घ्या…, खोक्यानं घ्या.. कुणी खोऱ्यानं घ्या…, कुणी गुवाहाटीला जा कुणी सुरतला जा”, असे अभंग गात महाविकास आघाडीने सरकारविरोधात आंदोलन केली.

महाविकास आघाडीच्या दिंडी आंदोलनात सर्व आमदारांनी पांढऱ्या टोप्या परिधान केल्या होत्या. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गळ्यात टाळ वाजवित आणि फुगड्या घातल्या. सर्व आमदारांनी रिंगण करीत आणि अभंग गात टाळ वाजवित विधानभवनाच्या पाऱ्याजवळ आंदोलन केले.

महाविकास आघाडीच्या आंदोलनदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि अन्य आमदारांनी फुगड्या घालून सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन केली. या आंदोलनात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील टाळ वाजवित सहभागी झाले. गायरान जमीन प्रकरणी आणि भूखंड घोटाळ्याप्रकरणी राज्याचे कृषी मंत्री अब्दलु सत्तार आणि अन्न व औषध प्रशासन संजय राठोड या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत महाविकास आघाडीने आंदोलन केली होती.

 

 

 

Related posts

सप-बसपच्या आघाडीने मोदींची झोप उडाली

News Desk

संजय राऊत यांच्या निवासस्थानी ED चे पथक दाखल; ‘या’ प्रकरणी अटक होणार?

Aprna

युतीसाठी शिवसेनेने सुचविलेला १९९५चा फॉर्म्युला भाजपला मान्य होणार ?

News Desk