HW News Marathi
राजकारण

दुष्काळाबाबत केंद्र-राज्य सरकार गंभीर नाही !

मुंबई | राज्यातील दुष्काळाबाबत केंद्र सरकारची मदत मागत असताना वस्तुस्थिती काय आहे हे केंद्राला सांगितल्यानंतरच केंद्र सरकार पथक पाठवत आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळाबाबत केंद्र व राज्य सरकार गंभीर नसल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. केंद्र आणि राज्याच्या दुष्काळी प्रश्नाबाबत असलेल्या अनास्थेबद्दल शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दुष्काळ पाहणीसाठी आलेले पथक रात्रीची पाहणी करत आहे. राज्य सरकार हव्या त्या योजना करताना दिसत नाही. आघाडी सरकार होते तेव्हा मी स्वतः दुष्काळी भागाचा दौरा केला होता. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी तातडीने मदत केली होती. मात्र हे सरकार दुष्काळप्रश्नी गंभीर नाही असे दिसत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवारांच्या वाढदिवशी समारंभ करु नका, त्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना करा !

राज्यावर भयंकर दुष्काळाचे सावट असल्यामुळे शरद पवार यांच्या वाढदिवशी कुठलाही समारंभ करण्याऐवजी तो निधी किंवा मदत दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांना दयावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

शरद पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबर रोजी असतो. आजपर्यंतच्या आपल्या प्रदीर्घ कार्यकाळामध्ये देशवासियांवर संकट आलेले असताना शरद पवार यांनी वाढदिवस साजरा केलेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवशी आपल्या भागातील लोकांना शक्य असेल ती मदत करावी, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जोपर्यंत काश्मीरमध्ये हिंदू राजा होता तोपर्यंत हिंदू-शीख सुरक्षित होते !

Gauri Tilekar

२३ मेपर्यंत वाट पहा, तेव्हाच सत्यपरिस्थिती समोर येईल !

News Desk

कुमारस्वामी घेणार सोनिया गांधींची भेट, मंत्रीमंडळाबाबत चर्चेची शक्यता  

News Desk
राजकारण

नाशिकच्या हिरे कुटुंबियांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

News Desk

मुंबई । नाशिकमधील माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे आणि अद्वैत हिरे यांच्यासह त्यांच्या हजारो समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या जाहीर प्रवेशासाठी आज राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार पक्ष कार्यालयात आले होते. यावेळी शरद पवार यांनी हिरे कुटुंबियांचे पक्षात स्वागत केले. शिवाय नाशिक तसेच नाशिकच्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे कौतुकही केले. भाऊसाहेब हिरे यांच्या नाशिकसाठी असलेल्या योगदानाबाबतही त्यांनी भाष्य केले. फळबागायतीमध्ये क्रांती केलेला हा नाशिक जिल्हा असल्याचे गौरवोदगारही यावेळी शरद पवार यांनी काढले.

“हिरे कुटंबियांची विचारधारा चांगली आहे. ते दुसऱ्या पक्षात गेले तो अपघात होता. त्या अपघातातून सावरुन त्यांनी त्यांची गाडी योग्य वळणावर आणली आहे. भुजबळांना बळ देण्यासाठी हे दोन तरुण आता उभे ठाकले असून आता सगळ्या क्षेत्रात नाशिकचा नावलौकिक वाढवण्यासाठी सर्वांनीच कामाला लागा आमची साथ कायम राहील”, असे आश्वासन शरद पवार यांनी यावेळी दिले. नाशिककरांनी नेहमीच शरद पवार यांच्या विचारांना साथ दिली आहे. नाशिककरांच्या कोणत्याही समस्यांची जाण सरकारला नाही. परंतु शरद पवार हे नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत”, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

माजी मंत्री प्रशांत हिरे,माजी आमदार अपूर्व हिरे आणि अद्वैत हिरे यांचे पक्षात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वागत केले. या पक्ष प्रवेशामुळे नाशिकसह दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढणार आहे. यामुळे छगन भुजबळ यांना आणखी ताकदीने काम करता येणार असल्याचा विश्वासही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.”हिरे कुटुंबियांशी काही काळ दुरावा निर्माण झाला होता. परंतु आता कोणताही दुरावा नाही. त्यांना नाशिकच्या राजकारणामध्ये मानाचे स्थान दिले जाईल”,असेही आमदार छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

Related posts

निर्मला गावित यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा दिला राजीनामा

News Desk

लोकशाही दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून कार्यक्रमाचे आयोजन

News Desk

“एकनाथ शिंदे शिवसेनेचे नाही ते भाजपचेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात”, जयंत पाटलांचा टोला

Aprna