HW News Marathi
राजकारण

चंद्राबाबू नायडू यांनी घेतली राहुल गांधींची भेट

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर आता देशातील राजकीय पक्ष निवडणुकांच्या नंतरची रणनीती आखण्यात व्यस्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आज (१८ मे) सकाळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राहुल गांधींनंतर चंद्राबाबू नायडू हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, युपीए अध्यक्ष सोनिया गांधी तसेच बसप अध्यक्ष मायावती आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

चंद्राबाबू नायडू यांनी याआधी शुक्रवारी (१७ मे) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन बराच वेळ चर्चा देखील केली. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे देखील निवडणुकांच्या निकालानंतरच्या समीकरणांसाठी अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेत आहेत. चंद्रशेखर राव यांनी गेल्या आठवड्यात केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन तसेच डीएमके नेते एम. के. स्टॅलिन यांची देखील भेट घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्याच्या घटलेल्या उत्पन्नाची सत्ताधाऱ्यांना जाणीव आहे का? 

News Desk

रात्रभर यूट्यूबवर व्हिडिओ बघतात, सकाळी ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणतात !

News Desk

सध्याच्या शिवसेनेचे धंदेवाईक राजकारण सुरु !

swarit