HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांची खासदार, आमदारांसह नगरसेवकांची ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर खासदार आमदार आणि नगरसेवकांची बैठक बोलविली आहे. मुंबईतल्या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. “लोकसभा निवडणुकीच्या वेळीच विधानसभेचा फॉर्म्युला ठरला. येत्या दोन दिवसात युतीचा जागावार कळतील,” असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगितले. आता मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नमकी या चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

“मुख्यमंत्र्यांची आमची यादी जाहीर करणार असल्याचे पुन्हा एकदा ठाकरे पत्रकार परिषदे म्हणाले.” “सन्मानित जागा मिळाल्या तर युती होणार असे स्पष्ट संकेत देखील त्यांनी दिले,” असे ठाकरेंनी दिले. शिवसेनेने आज (२० सप्टेंबर) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील मंत्र्यांची बैठक बोलविली होती. यावेळी विकास कामाला शिवसेनाचा विरोध नाही, असे ठाकरे म्हणाले. आरेतील वृक्ष तोडीला शिवसेनेचा विरोध असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मेट्रो कारशेडचा वाद हा पर्यावरणापेक्षा राजकीय”, उपमुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Aprna

भाजप पूर्णपणे मोदी-शहांच्या कब्जात आहे | निरुपम

News Desk

ठाकरे गटाच्या ‘मशाल’ चिन्हाविरोधातील समता पक्षाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली

Aprna