HW News Marathi
राजकारण

दिग्गज नेत्यांच्या भाषेची पातळी घसरली, महाराष्ट्रात ‘चड्डी’चे राजकारण

सोलापूर | लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोप करताना दिग्गज नेत्यांची जीभ घसरण्याचे प्रकार सर्रास पाहायाल मिळातात. “पराभव समोर दिसत असल्यामुळेच शरद पवारांचा तोल सुटत चालला आहे. भाजपमध्ये गेल्यानंतर चड्या घालून मांड्या दाखवू नका. परंतु, इथे तर फुल पॅन्ट आहे. तुम्हीच या चड्डीवाल्यांच्या सपोर्टवर मुख्यमंत्री झाला होता, हे विसरू नका. तसेच २३ मेला कळेल की, कोणाच्या चड्ड्या उतरतील, असा टोला मुख्यंमत्र्यांनी पवारांना लगावला आहे. यात महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांच्या नावाचा समावेश झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भाषाने खालची पातळी गाठली आहे, अशी टीका केली आहे

शरद पवार यांनी माढामध्ये १९ एप्रिलला पार परडेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादीतून नुकतेच भाजपत प्रवेश केलेल्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर टीका करत भाजप ला लक्ष्य लक्ष केल होता. “आपल्या जुन्या सहकाऱ्याबद्दल मी कधी आकसाने बोलणार नाही. पण आता त्यांनी फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नये. नाहीतर सहकारमहर्षींना काय वाटेल?,” असे पवार म्हणाले होते.

भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री कुर्डुवाडी येथे आज (२१ एप्रिल) आयोजित सभेत बोलताना म्हणाले की, “माढा मतदार संघात निवडणूक लढण्यासाठी पवार साहेब आले होते. परंतु ते गेले. मी खेळणार नाही, बारावा गडी म्हणून मॅच पाहणार आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. ज्याला आम्ही बारावा खेळाडू म्हणूनही खेळण्यास तयार नव्हतो. त्याला मैदानात उतरवले. आता असली कोण? आणि नकली टीम कोण? हे येत्या २३ तारखेला समजेल. नकली टीमच्या भरोशावर मॅच जिंकू शकत नाही.”

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींच्या भेटीपासून तृप्ती देसाईंना रोखले

News Desk

अमेठीच्या पराभवाला घाबरून राहुल गांधी पळाले वायनाडला !

News Desk

सर्जिकल स्ट्राईकचे चाललेले राजकारण थांबले तरी पुरे | ठाकरे

News Desk