HW News Marathi
राजकारण

भाजप-शिवसेना युती अभेद्य | देवेंद्र फडणवीस

मुंबई | भाजप-शिवसेनाची युती अभेद्य राहणार असून या वेळी बहुमताचे विक्रम तोडून युती सत्तेत येईल असा विश्वास असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी पूर्णविराम लावला आहे. मुख्यमंत्री पुढे असे देखील म्हणाले की, “राज्यात पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीचे सरकार निवडून आणू हे जनतेने ठरवलेले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीला प्रचंड मोठे जनसमर्थन मिळताना दिसेल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.”

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षातील दिग्गज नेते मोठ्या संख्येने भाजपमध्ये येत असले तरी आम्ही भाजप-शिवसेना आणि मित्रपक्ष एकत्र विधानसभा लढविणार आहे. युतीबाबत संशय निर्माण करणा-या चर्चा व्यर्थ आहेत. युती अभेद्य आहे.भाजप आणि शिवसेनेत काही जागांबाबत मतभेद नक्कीच आहेत. परंतु, त्याबाबत येत्या १५ दिवसांच्या काळात चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भाजपच्या काही जागा शिवसेनेला द्याव्या लागणार आहेत, तर, शिवसेनेच्या काही जागा भाजपकडे येऊ शकतात. या जागांच्या अदलाबदलीची चर्चा व त्यावरील निर्णय १५ दिवसांत घेतला जाईल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दलितांवर खुनी हल्ला करणाऱ्यांना फाशीची शिक्षा करा

News Desk

भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राहुल लोणीकर

Manasi Devkar

तुम्हाला लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका !

News Desk