HW News Marathi
राजकारण

राज्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित | मुख्यमंत्री

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२८ फेब्रुवारी) विधिमंडळात निवेदन मांडले की, मुंबईसह राज्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव अधिवेशन आटोपते घेण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणेवर अधिक ताण येऊ नको म्हणून अधिवेशन स्थगित केले आहे. त्याचबरोबर काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे आभार मानले. विधानसभेची अंतर्गत सुरक्षा राखणे देखील गरजेचे असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

मुंबईत अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी पाच हजार पोलिस तैनात करण्यात आले आहे. त्याचबरोबर अधिवेशनावर येणाऱ्या मोर्चांसाठी १५०० पोलिसांचा बंदोबस्त आहे. तणावाच्या वेळी हा पोलीस बंदोबस्त इतर ठिकाणी वापरात यावा, म्हणून अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितले.

सध्या भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण पाहता मुंबईसह राज्यभरात सगळीकडे हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी काल (२७ फेब्रुवारी) मुंबईच्या सुरक्षेबाबत चर्चा करण्यासाठी तातडीची बैठक बोलावली होती. मुंबई आणि राज्यातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विधाभावनात ही बैठक बोलावली होती. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करण्याचा विचार झाला होता. या बैठकीला मुंबई पोलीस आयुक्त सुबोध कुमार जैस्वाल आणि डीजी दत्ता पडसलगीकर उपस्थित होते.

अधिवेशन काळात सर्व मंत्रिमंडळ आणि राज्यातील आमदार विधानभवनात परिसरात असल्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर अधिक ताण येतो. सर्व व्हीआयपी एकाच ठिकाणी जमत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर जास्त संवेदनशील होत असल्याचेही म्हटले जात आहे. मुंबईसह राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बोरिवलीत राष्ट्रवादीचा भाजप विरोधात गाजर वाटप करून विरोध

News Desk

सहकारी बँकेच्या ग्राहकांना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार; अमित शाहूची मोठी घोषणा

Chetan Kirdat

नरेंद्र मोदी हे माझे कोणत्याही प्रकारे शिष्य नाहीत !

News Desk